डाेणगाव व परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे, सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. सध्या पावसामुळे ग्रामीण भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पंखे, कुलरचा वापर ग्रामस्थ करीत आहेत. मात्र, वीजच राहत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने डाेणगाव येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. डाेणगाव येथे पूर्वीप्रमाणेच मालेगाव येथून वीजपुरवठा सुरू करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा परिषद कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांनी विदयुत वितरण कंपनीला कळविले होते. त्यावर विद्युत वितरण कंपनीने लवकर मालेगाववरून विद्युत पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापही विद्युत वितरण कंपनीने मालेगाववरून विद्युत पुरवठा न जोडल्याने वारंवार डोणगांव येथे विजेचा लपंडाव सुरू आहे.
वीजपुरवठा वारंवार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:41 IST