स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मोफत ऑनलाइन स्टेट सिरीज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:59+5:302021-01-16T04:38:59+5:30
कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांची बिकट अवस्था झाली आहे. अनेक युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत; परंतू, क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या ...
कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांची बिकट अवस्था झाली आहे. अनेक युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत; परंतू, क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची गैरसोय होत आहे. याची दखल घेत आमदार श्वेता महाले यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दररोज मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीजचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या स्पर्धा परीक्षा ऑनलाइन असून, कोणतेही शुल्क न घेता टेस्टसिरीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सोडविलेला पेपर सबमिट केल्यानंतर लगेच तपासणी करून किती मार्क पडले हे सुद्धा कळणार आहे. प्रत्येक महिन्यात यशस्वी उमेदवारांचे तथा तज्ज्ञ व्याख्यातांचे मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची उपयुक्त पुस्तके चिखली येथे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअॅप मोबाइल नंबरवर आपले नाव, पत्ता व शिक्षणाची माहिती पाठवून नोंदणी करावी, नोंदणी केलेल्या युवक-युवतींना दररोज टेस्टसिरीजच्या पेपरची लिंक पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या मोफत उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार महाले यांनी केले आहे. मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर या या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी सुमारे १०० विद्यार्थ्यांनी लिंक डाऊनलोड करून पेपर सोडविला आहे.