शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

जलसंधारणाच्या कामासाठी मिळणार मोफत जेसीबी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 15:50 IST

जलसंधारणाच्या कामासाठी शेतकरी व ग्रामपंचायतींना मोफत जेसीबी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील भारतीय जैन संघटनेचा जलसंधारणाचा पॅटर्न राज्यभर गाजला आहे. पावसाळ्यानंतर या मोहिमेची नव्याने तयारी सुरू झाली आहे. जलसंधारणाच्या कामासाठी शेतकरी व ग्रामपंचायतींना मोफत जेसीबी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा अभिनव उपक्रम जानेवारी व फेब्रुवारी महिन्यासाठी राबविण्यात येत आहे.सुजलाम् सुफलाम प्रकल्पाअंतर्गत भारतीय जैन संघटनेने आता जिल्ह्यातील गावांना जेसीबी मशीन देण्याचे ठरविले आहे. ज्या ज्या गावांना नव्याने जलसंधारणाची कामे करायची आहेत, त्यांना ही मशीन मागणीनुसार देण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. बुलडाणा जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामपंचायती, प्रगतशील शेतकरी, शेतकरी मंडळे यांच्यामार्फत प्रस्तावित जलसंधारण कामे करण्यासाठी बीजेएसच्या जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध होणार आहेत. या माध्यमातून सर्व तालुक्यांमध्ये वैयक्तिक व सामूहिक अशी विविध कामे करण्यासाठीदेखील ग्रामपंचायती त्यांच्या निधीतून किंवा लोकवर्गणी काढून मशीन मागवू शकतात. यासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनादेखील देखील या मशीनचा वापर करून शेताजवळील नाले साफसफाई करून खोलीकरण आणि शेतात नवीन शेततळी तयार करण्यासाठी संधी आहे. जलसंधारणाची कामे करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना मशीन हवी असेल त्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीकडे नावे द्यावीत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भारतीय जैन संघटनेकडून मोफत मशीन पुरवण्यात येईल. याकरीता मशीनला लागणारे इंधन व मशीन आॅपरेटरचे मानधन याचा खर्च त्या त्या ग्रामपंचायती अथवा शेतकºयांना करायचा आहे.ग्रामपंचायतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणा