यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल मगर यांनी गर्भवती महिलांना मार्गदर्शन केले. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. कानोडजे यांनी २५ गर्भवती महिलांची तपासणी केली. लॅब टेक्निशियन उकंडे यांनी गर्भवती महिलांची रक्त तपासणी केली. यात त्यांनी हिमोग्लोबीन, एचआयव्ही व थायरॉईटची तपासणी केली. आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. होणे यांनी गर्भवती महिलांना पोषक आहार व गर्भसंस्कारांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आरोग्य सेविका भुरकाडे, आरोग्य मदतनीस मोरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष ऋषी जाधव, शिवसेना युवानेते नीरज रायमुलकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे, पंचायत समिती सदस्य भुजंगराव म्हस्के, युवासेना तालुकाध्यक्ष भूषण घोडे, सरपंच भारत राहाटे, गजानन देशमुख, किशोर अवघडे, मिलिंद मोरे, शिवाजी देशमुख, तलाठी तांबेकर, भगवान सहाणे, प्रभाकर देशमुख, रमेश देशमुख, गणेश चैताने, किशोर देशमुख, विजय देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन ढगे, तर आभार युवासेना विभागप्रमुख धनंजय देशमुख यांनी मानले.
महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST