शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात मोफत डाळ वितरण रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 18:24 IST

बुलडाणा जिल्ह्यातील एकाही गोदामात चना, तूर डाळ शिल्लक नाही.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत माहे एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबत प्रतिमहिना प्रती कार्ड १ किलो चना अथवा तूर दाळ मोफत वितरीत केल्या जाणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील एकाही गोदामात चना, तूर डाळ शिल्लक नाही. त्यामुळे  बुलडाणा जिल्ह्यात मोफत डाळ वितरण रखडल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर संबंधित कार्ड धारकाला १ किलो चणा अथवा तूरदाळ मोफत देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला प्रती माह १६ हजार मेट्रीक टन चनाडाळ व तूरदाळ उपलब्ध करून देण्यात आली.  राज्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यातील काही जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांना चणा, तूर डाळीचे वितरण करण्यात येत आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील एकाही गोदामात तूर, चना डाळ उपलब्ध नाही. त्यामुळे गत दोन महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील एकाही लाभार्थ्यांला डाळीचे वितरण करण्यात आले नाही. परिणामी, जिल्ह्यात डाळीचे वितरण रखडल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाही.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत एप्रिल ते जून या तीन महिन्यांत प्रतिव्यक्ती ५ किलो याप्रमाणे तांदुळासोबत प्रति कार्ड १ किलो तूर, चना डाळ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानदाराला डाळीचे वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे डाळीचे वाटप रखडले आहे.- राजेश अंबुसकरजिल्हाध्यक्ष,बुलडाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, संघटना.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा