शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वरवट बकाल ग्रा.पं.मध्ये ७ लाखांचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:36 IST

नियमानुसार ठराव घेणे अनिवार्य असताना सरपंच सचिव यांनी सर्व नियम धाब्यावर बसवले.

- नारायण सावतकर लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : ग्रामसेवकाच्या मदतीने सरपंचाने सुमारे सात लाख रुपयाचा घोटाळा केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणाचा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला असून सरपंच व सचिवाकडून पैसे वसूल केले जाणार असल्याचे विस्तार अधिकाऱ्यांनी सांगितले.वरवटबकाल येथील ग्रामपंचायत संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ना त्या कारणाने ही ग्रामपंचायत नेहमीच वादाच्या भोवºयात सापडली आहे. येथील ग्रा. प. सदस्या बिबनुर बी शेख दस्तगीर यांनी दीड वर्षांपूर्वी वरवट बकाल येथील ग्रामपंचायतच्या झालेल्या भ्रष्टाचाराबाबत खातेनिहाय चौकशीची मागणी गटविकास अधिकारी संग्रामपूर यांना केली होती. या प्रकरणाचा पाठपुरावा देखील ‘लोकमत’ने सातत्याने केला होता. अखेर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर चौकशी पुर्ण झाली. संग्रामपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भिलावेकर यांनी दिड वर्ष चौकशी करून वरवट बकाल येथील ग्रामपंचायत माध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल अभिप्रायासह वरिष्ठांना सादर केला. ग्रामपंचायत सदस्या यांनी केलेल्या तक्रारीवरून ग्रामपंचायत वरवट बकाल चे सरपंच श्रीकृष्ण दातार व सचिव डी.बी.कोरे यांनी शासनाच्या १४ वित्त आयोग व सामान्य फंड यामधील केलेले कामे ग्रामपंचायतच्या शासकीय दफ्तरी नोंद न घेता नियमबाह्य मनमानी पणाने शासकीय निधीचा दुरुपयोग केला. आर्थिक फायद्यासाठी सामान्य फंडातून कार्यालयीन व स्वच्छतेच्या नावावर ७८ हजार ८२ रुपये, पाणी पुरवठा फंडातून मजूर व साहित्याच्या नावावर २३ हजार ५० रुपये, १४ वित्त आयोग निधीमधुन पथदिवे २ लाख ८५३ रुपये, महिला बाल कल्याण १३ हजार रुपये, अंगणवाडी साहित्य खरेदी ८१ हजार २० रुपये, महिला बाल कल्याण ६१ हजार ७०० रुपये, शालेय साहित्य खेळणी ९४ हजार रुपये असा एकूण ६ लाख ९७ हजार ८०५ रुपये भ्रष्टाचार झाला. ४ लाख ५० हजार ७७३ रुपयांची केलेली कामे साहित्य खरेदी, नियम बाह्य व जमाखर्चास मंजुरात घेण्याबाबत ग्रा प नियमानुसार ठराव घेणे अनिवार्य असताना सरपंच सचिव यांनी सर्व नियम धाब्यावर बसवले. १४ वित्त आयोग व सामान्य फंड निधीतुन नियमबाह्य साहित्य खरेदी केली आहे.

सरपंच श्रीकृष्ण दातार यांच्या कडून अर्धी रककम व सचिव डी.बी. कोरे यांच्याकडून अर्धी रककम वसुलीस पात्र आहेत. सखोल चौकशी केल्याचा अहवाल व अभिप्राय मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर केला आहे.- जे.एम.भिलावेकर,विस्तार अधिकारी