शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

एक कोटी सात लाख रुपयांनी फसवणूक;  खामगावातील दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:38 PM

Fraud of one crore seven lakh rupees मनोज अग्रवाल आणि निलेश इंगळे या दोघांनी संगनमत करून फिर्यादी रमेश गोरशट्टे यांची फसवणूक केली.

ठळक मुद्देबनावट लेटरहेड वापरून, त्यावर वेगवेगळ्या सह्या करून फ्लॉय अ‍ॅशची उचल केली. एक कोटी  सात लाख २० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे रमेश गौरशेट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भागीदार असलेल्या दोघांनी एक कोटी सात लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.यशोधरानगरातील  रमेश श्रीमंतआप्पा गौरशेट्टे (४४) , मनोज मधुसूदन अग्रवाल आणि निलेश नामदेव इंगळे यांची खामगाव येथे कुलस्वामिनी कॉर्पोरेशन नावाची भागीदारी फर्म आहे. याद्वारे तिन्ही भागीदार फ्लाय अ‍ॅश विक्रीचा व्यवसाय करतात. भागीदार असलेल्या मनोज अग्रवाल आणि निलेश इंगळे या दोघांनी संगनमत करून फिर्यादी रमेश गोरशट्टे यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने व्यवसायामध्ये पारदर्शकता न ठेवता तसेच भागीदारी बँक खात्यातून कोणतीही सूचना न देता रक्कमा काढून घेतल्या. तसेच कुलस्वामिनी कॉर्पोरेशनच्या नावे पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रावरून फ्लाय अ‍ॅश विकत घेऊन परस्पर विक्री चालू केली. तसेच विकलेल्या मालाची रक्कम फर्मच्या बँक खात्यात जमा न करता परस्पर हडप केली. संशयित आरोपींनी वेळोवेळी भागीदारी फॅर्मचे बनावट लेटरहेड वापरून, त्यावर वेगवेगळ्या सह्या करून फ्लॉय अ‍ॅशची उचल केली. भागीदारी बँक खात्याचा गैरवापर केला.  कुलस्वामिनी कॉर्पोरेशनच्या नावे हर्रासी पद्धतीने विकत घेतलेल्या ६७०० टन फ्लॉय अ‍ॅशची परस्पर विक्री करून एक कोटी  सात लाख २० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे रमेश गौरशेट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.या तक्रारीवरून शहर पोलिसांनी संशयित आरोपी मनोज अग्रवाल आणि निलेश इंगळे यांच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ४२०, ४०७, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस तपासात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

चौकशीनंतर आरोपी पसार!  फसवणूक प्रकरणातील संशयित भागीदार अग्रवाल आणि इंगळे यांना गुरुवारी सकाळी शहर पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले होते.  गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी चालली.   चौकशीअंती पोलिसांनी संशयित आरोपींना सोडल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांनी या संशयित आरोपींना ‘सहारा’ दिल्याचीही जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी