शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरोनाचे जिल्ह्यात चार बळी, ११४० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:35 IST

दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ७,८९४ संदिग्धांच्या अहवालापैकी ६,७५४ संदिग्धांचे अहवाल ...

दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ७,८९४ संदिग्धांच्या अहवालापैकी ६,७५४ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले.

एकट्या बुलडाणा तालुक्यात २१६, खामगाव तालुक्यात १२४, शेगावमध्ये ४२, देऊळगाव राजामध्ये ९०, चिखलीमध्ये ७७, मेहकरमध्ये १५४, मलकापूरमध्ये १३२, नांदुऱ्यात ५२, लोणारमध्ये ३३, मोताळ्यात ११३, जळगाव जामोदमध्ये ३, सिंदखेडराजा तालुक्यात ८१ आणि संग्रामपूर तालुक्यात २३ जण या प्रमाणे ११४० जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

दरम्यान, मेहकर तालुक्यातील विश्वी येथील ६० वर्षीय महिला, बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी येथील ६५ वर्षीय महिला, बुलडाणा येथील ७९ वर्षीय महिला आणि खामगावातील जोशीनगर मधील ८० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे १६ एप्रिल रोजी ७८० जणांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी २ लाख ९० हजार ५०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच आजपर्यंत ४३ हजार ६९३ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

--सक्रिय रुग्ण सहा हजारांच्या टप्प्यात--

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ४९ हजार ९९६ झाली असून त्यापैकी ५९८१ सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अद्यापही ४ हजार ६४१ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

--१४ टक्के नागरिकांच्या तपासण्या--

गेल्या एक वर्षामध्ये बुलडाणा जिलह्यातील १४ टक्के नागरिकांच्या अर्थात ३ लाख ५३ हजार ६१४ जणांच्या कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ लाख ६९ हजार ९०१ जणांच्या आरटीपीसीआर, १ लाख ७१ हजार ६४२ जणांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. सोबतच १२ हजार ७१ जणांच्या ट्रुनॅटद्वारे तपासण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचा सध्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १४.१३ टक्के आहे असून मृत्यूदर ०.६४ टक्के आहे. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८७.३९ टक्क्यांवर पोहोचले आहे.