शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे चार बळी, ११४० जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 11:15 IST

Corona Cases in Buldhana : ११४० जण कोरोना बाधित आढळून आले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ११४० जण कोरोना बाधित आढळून आले असून चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.दरम्यान, प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ७,८९४ संदिग्धांच्या अहवालापैकी ६,७५४ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले.एकट्या बुलडाणा तालुक्यात २१६, खामगाव तालुक्यात १२४, शेगावमध्ये ४२, देऊळगाव राजामध्ये ९०, चिखलीमध्ये ७७, मेहकरमध्ये १५४, मलकापूरमध्ये १३२, नांदुऱ्यात ५२, लोणारमध्ये ३३, मोताळ्यात ११३, जळगाव जामोदमध्ये ३, सिंदखेडराजा तालुक्यात ८१ आणि संग्रामपूर तालुक्यात २३ जण या प्रमाणे ११४० जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.दरम्यान, मेहकर तालुक्यातील विश्वी येथील ६० वर्षीय महिला, बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी येथील ६५ वर्षीय महिला, बुलडाणा येथील ७९ वर्षीय महिला आणि खामगावातील जोशीनगर मधील ८० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे १६ एप्रिल रोजी ७८० जणांनी कोरोनावर मात केली. आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या संदिग्धांच्या अहवालांपैकी २ लाख ९० हजार ५०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच आजपर्यंत ४३ हजार ६९३ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या