चिखली : भरधाव जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जबर धडक दिली. याअपघातात कार मधील चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २२ एप्रिलरोजी दुपारी साडे पाच वाजेच्या सुमारास देऊळगावराजा रोडवरील मलगीफाटयाजवळ घडली. देऊळगावराजाकडून एम एच ४०/ एन/ ७५९२ या क्रमांकाचा ट्रक येत होता. मलगीफाटयाजवळ येताच सदर ट्रकने समोरून येणाऱ्या एम एच ०८/ झेड/ ९५४३ याक्रमांकाच्या कारला धडक दिली. या अपघातात कार मधील भिकू किसन तायडे ५८ रा. रत्नागिरी, संदेश रामचंद्र कदम ३५,सौ प्रियदर्शनी संदेश कदम ३२,व नियतीसंदेश कदम ही सात वर्षांची चिमुकली सुद्धा जखमी झाली आहे. जखमींना रोडनेजाणाऱ्या प्रवाशांनी त्वरित उपचारासाठी चिखली ग्रामीण रुग्णालयात दाखलकेले. मात्र प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथेहलवण्यात आले. या अपघातामधील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुढीलतपास ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महाजन करीतआहे.
भरधाव ट्रक कारच्या अपघातात चार जण गंभीर
By admin | Updated: April 23, 2017 13:43 IST