शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

विविध अपघातात चार ठार, नऊ जखमी

By admin | Updated: April 10, 2016 01:30 IST

बुलडाणा जिल्ह्यात अपघातांची मालिका.

बुलडाणा : चिखली- बुलडाणा, चिखली-मेहकर तसेच साखरखेर्डा-शेंदुर्जन रस्त्यावर झालेल्या अपघातात एकूण चार ठार तर नऊ जण जखमी झाल्याची घटना ९ एप्रिल रोजी घडली.चिखली-बुलडाणा मार्गावर दुपारी ३.३0 च्या सुमारास झालेल्या अपघातातील अँपे क्र. एम.एच.२८, आर १२६0 हा प्रवासी घेऊन चिखली येथून बुलडाणाकडे जात असताना मालगणी-हातणीच्या दरम्यान बुलडाणाकडून चिखलीकडे येणार्‍या मॅक्झिमो क्र.एम.एच.१४ डी एफ १९६३ ने समोरासमोर धडक दिली. या अपघातात अमोल दत्तात्रय दवंड रा.वाडी ब्रम्हपुरी हा ठार झाला असून, इतर जखमींमध्ये अँपेचालक विलास सखाराम काळे रा.किन्होळावाडी, शुभांगी खंडागळे, चिखली, गुलाब शेळके शिरपूर, अमोल डाखुरकर कोनड, श्रीराम सावंत, संकेत गजानन सावंत, नंदा श्रीराम सावंत सर्व रा.गांगलगाव, प्रमिला भोलाने केळवद यांचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींना मिळेल त्या वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणावरून प्रकृती गंभीर असल्याने काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सिद्धूसिंग राजपूत, भगवान वाळेकर व दिलीप वानखेडे यांनी दिली. दुसरी घटना चिखली-मेहकर मार्गावर सकाळी ५ वाजता घडली. पारस येथून राख घेऊन निघालेला ट्रक क्र.एम.एच.४४/९५४४ ने चिखली-मेहकर मार्गावरील एमआयडीसीजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला जोरदार धडक दिली. यामध्ये चालक मदन रामकिसन शिरसाठ वय ३0 वर्षे रा.तेलघना ता.अंबेजोगाई जि.बीड आणि क्लिनर भरत रामकिसन केंद्रे वय १८ रा.लेंडेवाली ता.परळी जि.बीड हे दोघे जागीच ठार झाले. सकाळी पाच वाजता झालेला हा अपघात एवढा गंभीर होता की, ज्या निंबाच्या झाडाला धडक बसली ते मुळासकट उखडल्या गेले. मृतांना बाहेर काढणे अशक्य असल्याने क्रेन आणि जेसीबीच्या साहय़ाने मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पीएसआय बी.जी.भोई, पोहेकाँ सुनील राऊत, वाहतूक शाखेचे गोविंद नेमनार यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली. तिसरी घटना साखरखेर्डा-शेंदुर्जन रोडवर बाळसमुद्र फाट्याजवळ मोटारसायकल झाडावर आदळल्याने एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी रात्रीदरम्यान घडली आहे. साखरखेर्डा येथील गोरख रावसाहेब जाधव व पिंटू रमेश धनवटे हे दोन मजूर मजुरीचे पैसे आणण्यासाठी ८ एप्रिल रोजी रात्री ८.३0 वाजता बाळसमुद्र येथे जात असताना, समोरुन एक अज्ञात वाहन भरधाव वेगात आले. त्या वाहनाच्या प्रकाशामुळे मोटारसायकल चालक गोरख रावसाहेब जाधव याला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याची मोटारसायकल झाडावर जावून आदळली. त्यात गोरख जाधव (२३) हा जागीच ठार झाला, तर पिंटू रमेश धनवटे हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.