देऊळगाव राजा : स्थानिक सहकार विद्या मंदिरजवळ जाफ्रबादकडून येणाऱ्या कार आणि रस्त्यावर काम करणाऱ्या ट्रॅक्टर मध्ये समोरासमोर धडक झाल्याने कार चालकसह चार जण जखमी झाले. सदर घटना दुपारी १.३० वाजता घडली. २३ एप्रिल रोजी जाफ्राबाद येथे सामूहिक विवाह सोहळा आटपून जालन्याकडे मारोती स्विफ्ट कार एम.एच.२१ व्ही ८५२३ जात असताना सहकार विद्या मंदिरजवळ कंपनीचे वायर टाकण्याचे काम सुरू आहे. त्यात काम करणारे ट्रॅक्टर क्र.आर.जे.२९ आर. ए .९६१२ रोड वर मागे पुढे होत असताना समोर येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने कार मालक चालक मो.अफजल, मुफ्ती अब्दुल रहेमान, मुफ्ती फारुक सहाब, मुफ्ती सोहेल सहाब आणि हाफीज जुबेर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात भर्ती करण्यात आले, तर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
ट्रॅक्टर-कार धडकेत चार जखमी, एक गंभीर
By admin | Updated: April 24, 2017 02:49 IST