शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

 बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 19:39 IST

हुसकावून लावण्याच्या नागरिकांच्या प्रयत्नानंतर बिथरलेल्या बिबट्याने चौघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.

 जानेफळ/नायगाव दत्तापूर : मेहकर तालुक्यातील मोळा गावानजीक आलेल्या बिबट्याला हुसकावून लावण्याच्या नागरिकांच्या प्रयत्नानंतर बिथरलेल्या बिबट्याने चौघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. ही घटना सहा जून रोजी सायंकाळी सहा वाजे्च्या सुमारास घडली. दरम्यान, जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.शनिवारी सायंकाळी मोळी शेत शिवारातून मोळा गावानजीक असलेल्या नाल्यात बिबट्या उतरल्याचे पाहून शेतात काम करणाºया महिला व नागरिकांनी एकच आरडाओरड केली. त्यामुळे गावातील युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने मोळा-मोळी या दोन गावाच्या दरम्यानच्या नाल्याच्या दिशेने धाव घेतली.नागरिकांची आरडाओरड व धावत येणारे नागरिक पाहता बिबट्या बिथरला व त्याने समोर दिसेल त्याच्यावर हल्ला करण्यास सुरूवात केली. यामध्ये गर्दीतील निखील धोटे, मधुकर वानखेडे, दत्ता वानखेडे  आणि गिताबाई कड (सर्व रा मोळी) जखमी झाल्या आहेत. यातील निखिल धोटे हा १३ वर्षाचा मुलगा आहे. सर्व जखमींना उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.या संदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली असून वृत्त लिहीपर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. राजू रहाटे यानी वनपाल एस. वाय. बोबडे यांना या घटनेची माहिती भ्रमणध्वनीवर कळवली आहे.

शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरणमान्सूनपूर्व पावसाच्या आगमनामुळे सध्या सर्वत्र शेतातील मशागतीचे कामे जोमात सुरू आहेत. काडी कचरा वेचण्यापासून वखर पाळीही देण्यात येत आहे. त्यामुळे शेतात मजूर व शेतकºयांची गर्दी झाली आहे. मात्र आता बिबट्याच्या या परिसरातील वावरामुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाleopardबिबट्याMehkarमेहकर