जिल्ह्यात चार मृत्यू, ६१९ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:34 AM2021-04-10T04:34:31+5:302021-04-10T04:34:31+5:30

प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ३१२ व रॅपिड टेस्टमधील ३०७ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून ५५६ तर रॅपिड टेस्टमधील ...

Four deaths in the district, 619 corona positive | जिल्ह्यात चार मृत्यू, ६१९ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात चार मृत्यू, ६१९ कोरोना पॉझिटिव्ह

Next

प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ३१२ व रॅपिड टेस्टमधील ३०७ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून ५५६ तर रॅपिड टेस्टमधील ४,२३६ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये बुलडाणा शहरातील ९८, तालुक्यातील गोंधनखेड, मासरूळ, कुलमखेड दोन, डोमरूळ दोन, धाड तीन, रूईखेड, पिं. सराई दोन, सावळी पाच, म्हसला, कुंबेफळ, चांडोळ, करडी येथील प्रत्येकी एक, रायपूर येथे पाच रुग्णांचा समावेश आहे. मोताळा शहरात सहा, मोताळा तालुक्यातील पिं. देवी दोन, मूर्ती, पुन्हई, शेलापूर, धानखेड, वरूड, निपाणा, माळेगांव प्रत्येकी एक, आव्हा तीन, उऱ्हा दोन, जयपूर पाच, उबाळखेड दोन, रोहीणखेड तीन, धा. बढे सहा, किन्होळा एक कोरोना पॉझिटिव्ह आहे. खामगाव शहरात ४६, खामगाव तालुक्यातील सुटाळा तीन, हिवरा २, आंबेटाकळी एक, शेगांव शहरात २६, शेगांव तालुक्यातील मानेगांव, पहुरजिरा, मोरगांव, खेर्डा, टाकळी धारव, हिंगणा, मच्छींद्रखेड, गौलखेड, शिरसगांव, नागझरी, जवळा, माटरगांव येथे रुग्ण आढळून आले.

चिखली शहरात ८, चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर १२, चंदनपूर १, रोहडा, इसोली १, मुरादपूर, शेलूद ३, खैराव, कोलारा, कनारखेड, माळशेंबा २, पळसखेड नाईक २, मलकापूर शहरात ७३, मलकापूर तालुक्यातील बहापुरा १, वाघुड १, देवधाबा, दुधलगांव, वडोदा, घिर्णी ३, दाताळा २, दे. राजा शहरात ३३, दे. राजा तालुका चिंचखेड ४, दे. मही ३, अंढेरा २, सिनगाव जहा २, वाकी, सावंगी टेकाळे, सरंबा, सिंदखेड राजा शहरात २, सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड ३, साखरखेर्डा ३, डावरगाव, आलापूर, मेहकर शहरात २१, मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी २, डोणगाव २, लोणी गवळी २, संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी २, जळगाव जामोद शहरात ५, नांदुरा शहरात १८, नांदुरा तालुक्यातील डिघी २, वडनेर ९, शेलगाव मुकुंद ३, टाकरखेड २, पोटा ३, आलमपूर ४, हिंगणे गव्हाड ३, लोणार शहरात ६, लोणार तालुक्यातील सावरगाव २, टिटवी ५, बिबी १५, सुलतानपूर ८, दाभा २ पॉझिटिव्ह आहेत.

या ठिकाणी झाले मृत्यू

जिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील दहीद येथील ४७ वर्षीय पुरुष, जयपूर ता. मोताळा येथील ६५ वर्षीय पुरुष, भोरसा भोरसी ता. चिखली येथील ६० वर्षीय पुरुष, चांगेफळ ता. मेहकर येथील ३२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Four deaths in the district, 619 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.