शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तालुकास्तरीय समित्यांचे गठन रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 11:50 IST

नवीन तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले नाही.

ठळक मुद्देलाभार्थ्यांना कार्यालयात येऊन चकरा माराव्या लागत आहेत. कल्याणकारी योजनांची प्रकरणे शासन दरबारी प्रलंबित आहेत.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : निवडणुका होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे; मात्र नवीन तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित, मजूर, शेतकरी इत्यादींच्या कल्याणकारी योजनांची प्रकरणे शासन दरबारी प्रलंबित आहेत.गोरगरीब जनता व शेतकऱ्यांची कामे त्वरित मार्गी लावावी, त्यांच्यापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात, याकरिता संजय गांधी निराधार समिती, आरोग्य समिती, दक्षता समिती, महात्मा गांधी रोजगार समिती, अन्न धान्य रेशन वाटप समित्यांचे गठन करण्यात येते; मात्र एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरी महाआघाडी सरकारने या समित्यांचे गठन केले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना कार्यालयात येऊन चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे गरीब जनतेच्या विविध कामांच्या प्रलंबित प्रकरणाबाबत अधिकारी वेळकाढू धोरण अवलंबितात, तसेच दलालही सक्रिय असल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. समित्या स्थापन झाल्यास प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास मदत होऊ शकते. समित्या नसल्याने शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही. कोरोनामुळे गत नऊ महिन्यांपासून अनेक शासकीय योजनांचे काम ठप्प पडले आहे. 

 

खामगाव तालुक्यात तालुकास्तरीय समित्यांचे गठन करण्यात आले नाही. अद्याप शासनाने या समित्या स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला नाही.- शीतल रसाळतहसीलदार, खामगाव.

या समित्या गोरगरिबांच्या हक्कासाठी स्थापन करण्यात येतात. यामुळे गरीब लाभार्थ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लागतात. समित्यांच्या बैठकांमध्ये प्रकरणे निकाली लागतात. त्यामुळे त्वरित या समित्या गठित करायला हव्या.- सुरेश गव्हाळ, तालुकाध्यक्ष, भाजप, खामगाव.

हे वेदनाशून्य सरकार आहे. त्यामुळे या समित्या गठित करण्यात आल्या नाहीत. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता या समित्यांचे गठन त्वरित करायला हवे.- अशोक सोनोनेप्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी. 

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना