शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांसमोर दरपत्रक लावण्याचा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 11:15 IST

कृषी केंद्र धारकांनी त्यांच्या दुकानात दर्शनी भागात दरफलक लावण्यात आले नसल्याची परिस्थिती ‘लोकमत स्टिंग आॅपरेशन’ दरम्यान समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील काही कृषी केंद्र धारकांनी त्यांच्या दुकानात दर्शनी भागात दरफलक लावण्यात आले नसल्याची परिस्थिती ‘लोकमत स्टिंग आॅपरेशन’ दरम्यान समोर आली आहे.कृषी सेवा केंद्र धारकांना दुकानाच्या दर्शनी भागात बियाणे, खतांचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. परंतु खामगाव शहरात अनेक दुकानांमध्ये असे दरपत्रक लावण्यात आलेले नाही.काही दुकानांमध्ये दरपत्रक लावण्यात आले आहेसुध्दा; परंतु ते ग्राहकांना व्यवस्थीत दिसत नाही. यामुळे शासनाच्या आदेशाला बगल दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोना आजाराच्या पृष्ठभुमिवर गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही परिस्थिीती पाहता, दुकानांवर दर्शनी भागात दरपत्रक लावल्यास ग्राहकांना खते, बियाण्याचे दर सहज वाचता येतात. भाव विचारण्यासाठी दुकानदारांशी संवाद साधण्याची गरज पडत नाही. पर्यायाने एकमेकांशी संपर्क कमी करण्यास मदत होते. परंतु खामगाव शहरातील अनेक दुकानांमध्ये दरपत्रक नसल्याचे दिसून येते. असे केले स्टिंग...खामगाव शहरातील काही दुकानांमध्ये दरपत्रक लावण्यात आले नाहीत, अशी माहिती लोकमत प्रतिनिधीला मिळाली. यानंतर रविवारी दुपारी शहरातील मुख्य मार्गावरील दुकानांमध्ये जावून परिस्थितीची पाहणी करण्यात आली. यावेळी काही दुकानदारांनी दरपत्रकल लावले नसल्याचे दिसून आले तर काही दुकानांमधील दरपत्रक व्यवस्थीत दिसत नव्हते.

दिलेल्या वेळेनुसार दुकाने उघडण्याकडे दुर्लक्ष!काही दुकानांच्या शटरवर दुकाने उघडे ठेवण्याची सुचना लिहिलेली दिसून आली. प्रत्यक्षात मात्र दुकान बंदच असल्याचे दिसून आले. ५ ते ६ दुकाने बंदच होती. काही दुकानांमध्ये असलेल्या व्यक्तींनी मास्कही लावला नव्हता. याकडे कृषी विभगाने लक्ष देवून नियमांचे पालन करवून घेण्याची गरज आहे.दरपत्रक लावण्याच्या सुचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. तरीसुध्दा पथकामार्फत पाणी करून ज्या दुकानांमध्ये दरपत्रक आढळणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.-गणेश गिरी, तालुका कृषी अधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा