शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वृक्ष तोडीवर कारवाईसाठी वनविभागाला सापडला मुहुर्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 16:56 IST

सिंदखेड राजा: वृक्ष  लागवड व संवर्धनावर शासन करोडो रुपय खर्च करत असताना दुसरीकडे राजरोसपणे वृक्षाची कत्तल सुरू आहे. दरम्यान, आता तालुक्यात अवैध वृक्षतोडीवर कारवाईसाठी वनविभागाला मुहुर्त सापडला आहे.

सिंदखेड राजा: वृक्ष  लागवड व संवर्धनावर शासन करोडो रुपय खर्च करत असताना दुसरीकडे राजरोसपणे वृक्षाची कत्तल सुरू आहे. दरम्यान, आता तालुक्यात अवैध वृक्षतोडीवर कारवाईसाठी वनविभागाला मुहुर्त सापडला आहे. वनरक्षक  आर. एस. जोगदंड यांनी वन विभागाच्या इतर अधीकाºयांना बोलाऊन अवैधरीत्या तोडून टाकलेल्या १९ निंबाच्या झाडाची मोठ-मोठी लाकडे जप्त केली आहेत. ही कारवाई जिजाऊ सृष्टी परिसरात शनिवारी घडली आहे.  आधुनीक तंत्रज्ञानामुळे देशाची झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल सुरु झाली. मात्र त्याचे दुष्परिणाम सुध्दा पहायला मिळत आहे. पूर्वीच्या काळी घणदाट जंगल असायचे, त्यामुळे पाऊस सुध्दा चांगला पडायचा. जंगलात पशु -पक्षी, वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, कोल्हे, माकड, हरण, रोही, बीबट, मोर हे गुण्या गोविंदाने जंगलात वास्तव्य करीत होते. परंतु मानवाच्या गरजा भागविण्यासाठी जंगलात अतिक्रमण झाले. जंगलात वृक्षतोड वाढल्यामुळे जंगल ऊजाड झाले. त्यामुळे जंगलातील प्राणी बीबटे वस्त्यामध्ये घुसायला लागले आहेत. तर काही प्राणी रोही, हरण, आस्वल, रानडुक्कर शेतातील पिकांची नासाडी करायला लागले दिसतात. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामस्वरूप दुष्काळाच्या संकटाची दाहकता वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी शासन हजारो कोटी रुपयांचा खर्च करताना दिसत आहे. तर दुसरीकडे ज्या वन विभागाच्या भरवशावर वृक्ष लागवडीचे व संगोपणाचे शासनाने उदीष्ट ठेवले त्याच वनविभागाच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षाने हजारो वृक्षांची कत्तल तालुक्यात सुरू आहे. वृक्षतोडीला परवानगी देण्याचे सर्व अधिकार  वनविभाकडे असल्यामुळे वृक्षतोड माफीया व अधिकाºयांचे संगनमताने पाच झाडाचे परवाने दिल्यास त्या परवान्यावर ५० झाडाची कत्तल केली जात आहे. दरम्यान, जिजाऊ सृष्टी जवळ तोडून टाकलेल्या निंबाच्या लाकडावर सिंदखेड राजा येथील वनरक्षक कु. आर. एस. जोगदंड यांनी ३ मे रोजी धाड टाकली. सहाय्यक वनसंरक्षक बुलडाणा, वन परिक्षेत्र अधीकारी देऊळगाव राजा यांना पाचारण करुन कारभारी यादवराव घोंगे, गोपीनाथ कडूबा जाधव या पंचासमक्ष १९ निंबाचे झाडे तोडलेल्या लाकडाचे पंचनामे करुन लाकूड जप्त करण्यात  आले. हे साठवुन ठेवलेली निंबाची लाकडे भास्कर बळवंतराव खंडारे यांच्या मालकीची असून त्यांचे कडे फक्त  सहा निंबाची झाडे तोडण्याचा परवाना असल्याची माहिती पंचनाम्यात देण्यात आली आहे. लाकडांचे मोजमाप करुन जत्प केल्यावर काळापाणी नर्सरीत साठवण्यात आले. (शहर प्रतिनिधी)वृक्षतोड माफियांमध्ये खळबळ सिंदखेड राजा येथे १९ निंबाच्या झाडाची मोठ-मोठी लाकडे जप्त करून केलेल्या कारवाईमुळे वृक्षतोड माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई एकाच व्यक्तीवर झाली असून ईतर वृक्षतोड माफीयांना वनविभाग काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभागSindkhed Rajaसिंदखेड राजा