खामगाव : शहरात घुसलेल्या बिबट्याला अपुर्या साधनानीशी स्थानिक काही नागरिक व वन विभागाच्या कर्मचार्यांनी जेरबंद केल्यानंतर शहरात बुधवारी मोठा अनर्थ टळला. आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक वन विभागत बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, बुलडाणा आणि मेहकर येथे बचाव पथक सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. दरम्यान, त्यानुषंगाने जिल्हा उपवनसंरक्षक कार्यालयातर्फे एक प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे. खामगाव शहरात बुधवारी घुसलेल्या बिबट्याने सहा जणांना जखमी केले होते. सुमारे २00 किलो वजनाचा आणि चार वर्षाचा संपूर्ण वाढ झालेला हा नरबिबट पकडण्यासाठी वन विभागाकडे साधनांची कमतरात असल्याचे रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान आढळून आले होते. पृष्ठभूमीवर वन विभाग जिल्ह्यात तीन रेस्क्यू पथक जिल्ह्यात स्थापन करणार येणार असल्याचे जिल्हा उपवनसंरक्षक बी. टी. भगत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यानुषंगाने खामगावचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांनीही पाठपुरावा वनविभागाकडे सुरू केला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही या मुद्दय़ावर अँड. आकाश फुंडकर चर्चा करणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. खामगावात बिबट्या घुसल्याने वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसोबतच नागरिकांना आपतकालीन परिस्थितीत सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे.
वन विभाग करणार ‘रेस्क्यू टीम’ सुसज्ज!
By admin | Updated: December 4, 2015 02:39 IST