शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या अस्वलास वन विभागाने दिले जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:26 IST

Bear falls into a well एका शेतातील विहिरीत पडलेल्या अस्वलास वाचविण्यात वनविभागाच्या बचाव पथकास यश आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगत असलेल्या डोंगरशेवली शिवारात रात्री  एका शेतातील विहिरीत पडलेल्या अस्वलास वाचविण्यात वनविभागाच्या बचाव पथकास यश आले आहे. दरम्यान, या अस्वलास नंतर ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आले.चिखली तालुक्यातील किन्होळा येथील रहिवासी पाटीलबुवा भिवसन बाहेकर यांचे डोंगरशेवली शिवारातील गट क्र.  ३१६ मध्ये शेत आहे. या शेतातील विहिरीत  अस्वल पडले असल्याचे सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली. त्यांतर उपवन संरक्षक अक्षय गजभिये, एसीएफ रणजीत गायकवाड यांच्या निर्देशानुसार बुलडाणा वन विभागाचे बचाव पथकातील कर्मचारी वनपाल राहुल चव्हाण, संदीप मान्टे, विलास मेरत, संदीप मडावी व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वी घटनास्थळाचा परिसर या बचाव पथकाने निर्मनुष्य केला. जेणेकरून कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही, या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आली.  त्यानंतर विहितीत बाज टाकून अस्वलास बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. त्यात यश न आल्यामुळे विहीरीत पिंजरा टाकण्यात आला व बऱ्याच परिश्रमानंतर  अस्वल पिंजऱ्यात शिऱल्यावर तो बाहेर काढण्यात आला. त्यानंतर या अस्वलास लगतच्या ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूपपणे सोडण्यात आले.  ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगतच्या भागात वन्य प्राणी विहीरीत पडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीव