शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय नसल्यास फौजदारी गुन्हे

By admin | Updated: May 26, 2017 01:17 IST

राशन व शासकीय दाखले योजना होणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र अजूनही बरीच गाव हागणदारीमुक्त झालेली नाहीत. तर ग्रामीण भागात शौचालय बांधकाम संदर्भात उदासिनता दिसून येत आहे. यापुढे शासनाने कठोर पावले उचलत ज्या कुटूंबाकडे शौचाय नसेल त्याला शासनाचा कोणताच लाभ देण्यात येणार नाही. तर त्याचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे पदही अपात्र ठरविण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरुन पंचायत समितीला तसे आदेश प्राप्त झाले आहेत.ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबात शौचाय असले पाहिजे, तसेच संपूर्ण गाव हागणदारीमुक्त करुन गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ व चांगले रहावे, यासाठी शासनाकडून गेल्या ५ ते ६ वर्षापासून वेगवेगळ्या नावाने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छता मोहिमेला मेहकर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती, सदस्य, कर्मचारी वर्ग यांनी ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणात राबविली होती. शौचालय बांधकाम करुन त्याचा नियमीत वापर करावा, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पं.स. स्तरावरुन विविध उपक्रम राबविले होते. तर ज्यांचेकडे शौचालय बांधकाम पूर्ण नसेल त्यांचेवर नियमानुसार कारवाई सुद्धा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी अनेकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले होते. अलीकडच्या काही वर्षामध्ये शौचालय बांधकामाची मोहीम थंडबस्त्यात सुरु होती. सरपंच, उपसरपंच सदस्य पद अपात्र ठरणारमेहकर तालुक्यात शौचालय बांधकाम संदर्भात उदासिनता दिसून येत असल्याने शासनाचा उद्देश सफल होतांना दिसत नाही. त्यामुळे आता ग्रामीण भागातील ज्या गावात ज्या वार्डातून ग्रा.पं.सदस्य निवडून आला असेल त्या वार्डातील प्रत्येक कुटूंबाकडे शौचालय बांधकाम पूर्ण करुन त्याचा नियमीत वापर असला पाहिजे, ही जबाबदारी त्या-त्या ग्रा.पं. सदस्यांची आहे. याप्रमाणे संपूर्ण गाव विहित मुदतीत हागणदारीमुक्त झाले पाहिजे, जर असे झाले नाही तर त्या गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचेवर महाराष्ट्र ग्रा.पं.अधिनियम कलम ३९ अ नुसार कारवाई करुन सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे.राशन व शासकीय दाखले, योजना बंद होणारबुलडाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुका स्वच्छता अभियानात पिछाडीवर असल्याने वरिष्ठ पातळीवरुन सक्ती करुन शौचालय बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या कुटूंबाकडील शौचालय बांधकाम पूर्ण नसेल त्या कुटूंबाला शासनाचा कोणताच लाभ देण्यात येणार नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानामधील राशन बंद करण्यात येणार आहे. याशिवाय कोणताच शासकीय दाखले देण्यात येणार नाही.