शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रमशाळेतील १२ विद्यार्थीनींना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:22 IST

१४ डिसेंबरच्या संध्याकाळी ८ च्या दरम्यान येथील ३ मुलींच्या पोटात तीव्र वेदना आणि दातखिळ्या बसने सुरू झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील चिंचाळा येथील आदिवासी आश्रम शाळेतील १२ विद्यार्थीनींना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या विद्यार्थीनींवर मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मुलींची प्रकृती धोक्याबाहेर असून, अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केला.तालुक्यातील चिंचाळा येथील जिजामाता आदिवासी निवासी आश्रम शाळेत १ ते १२ पर्यंत ३८३ विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. १४ डिसेंबरच्या संध्याकाळी ८ च्या दरम्यान येथील ३ मुलींच्या पोटात तीव्र वेदना आणि दातखिळ्या बसने सुरू झाले. तेव्हा शाळेतील तीन मुलींना १४ डिसेंबरच्या रात्री प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव येथे आणले असता प्रथमोपचार करून शाळेत मुलींना परत नेले. मात्र रविवारच्या च्या सकाळी त्यातील दोन व आणखी एक अश्या तीन विद्यर्थीनींना डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्यांना तेथून मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले. नंतर रविवारच्या संध्याकाळी डोणगाव येथील एका खाजगी दवाखान्यात २ मुली भरती केल्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते न होतेच तोच आणखी दोन विद्यर्थीनींची प्रकृती बिघडली. त्यांना सुद्धा त्याच खाजगी रुग्णालयात दाखल केले. चिंचाळा येथील जिजामाता आदिवासी निवासी आश्रम शाळेतील १२ मुलींवर येथील डॉ. पंजाबराव शेजोळ यांच्या दवाखान्यात उपचार सुरू आहे. सद्यस्थितीत मुलींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. पुढील तपास मेहकर पोलिस करीत आहेत. या घटनेची माहीती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळुकर, दिलीप देशमुख, गटशिक्षणाधिकारी मधुकर वानखेडे, केंद्र प्रमुख सुरेश चव्हाण, आदिवासी विकास विभागाचे शिक्षण अधिकारी भोपळे यांनी विद्यार्थीनींची भेट घेतली. पोलीस तपास सुरूयावर खाजगी दवाखान्यात पोलीस प्रशासन पोहचून ठाणेदारांनी या प्रकरणी सर्व माहिती जाणून घेतली. महिला पोलिसांना सुद्धा दवाखान्यामध्ये विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आल्याची माहिती ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी दिली.

सर्व विद्यार्थीनींवर सध्या उपचार सुरू आहे. सर्व विद्यार्थीनी निगराणीमध्ये आहेत. या प्रकरणात स्त्री रोगतज्ञांचा सल्ला घेतला आहे.- डॉ. पंजाब शेजोळ,मेहकर.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर