शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन ग्रीष्मात खडकपूर्णा नदी झाली वाहती! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:52 IST

देऊळगाव मही: घाटावरील तीन तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न पाहता खडकपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात सहा दलघमी पाणी सोडण्यात आल्याने देऊळगाव महीनजीक प्रवाह खंडित झालेल्या खडकपूर्णा नदीत ऐन ग्रीष्मात पाणी खळखळत असल्याचे पाहून अनेकांच्या दिलासा मिळत आहे.

ठळक मुद्देअनेकांनी घेतला पाण्यात डुंबण्याचा आनंद

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव मही: घाटावरील तीन तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न पाहता खडकपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात सहा दलघमी पाणी सोडण्यात आल्याने देऊळगाव महीनजीक प्रवाह खंडित झालेल्या खडकपूर्णा नदीत ऐन ग्रीष्मात पाणी खळखळत असल्याचे पाहून अनेकांच्या दिलासा मिळत आहे.त्यामुळे चिखली-देऊळगाव राजा मार्गावर प्रवास करणारे अनेक जण नदीकाठी पुलाच्या बाजूला वाहने लावून या काळ््याशार वाहत्या पाण्यात मनसोक्त डुबकी मारण्याचा आनंद घेत आहे. अवर्षणसदृश स्थितीत नदीपात्रातील पाणी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे, तर लग्न समारंभासाठी जाणाºया वºहाडी मंडळींसाठीही येथील पाण्याची डुबकी ही आनंदाची पर्वणी घेऊन आली आहे. परभणी जिल्ह्यातून लग्नासाठी आलेल्या अनेक वºहाडींनी या नदीपात्रात पाण्यात डुबकी घेतली.दरम्यान, आणखी दोन दिवस हे पाणी नदीपात्रातून वाहणार असून, खडकपूर्णा नदीवरील  वायाळा, दुसरबीड आणि दिवखेड येथील कोल्हापुरी बंधारे भरल्यानंतर प्रकल्पाचे दोन्ही गेट बंद करण्यात येणार आहे; मात्र सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे परिसरातील गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

रेती माफियांनाही चाप!कोरड्या पडलेल्या खडकपूर्णा नदीपात्रातून रेती माफियांनीही रेतीचा उपसा सुरू केला होता. महसूल विभागानेही त्यांच्यावर कारवाई केली; पण छुप्या पद्धतीने रेतीचा अवैध उपसा काही ठिकाणी सुरू आहे; परंतु आता नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने या पाण्यातून रेतीचा उपसा करणे रेतीमाफियांना तूर्तास तरी शक्य नाही. त्या पद्धतीची साधने त्यांच्याकडे नाहीत. सोबतच त्यांची वाहनेही नदीपात्रात आता जाऊ शकणार नसल्याने किमान तीन ते चार दिवस तरी महसूल विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeulgaon Rajaदेऊळगाव राजा