शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बालाजींच्या चरणी कुरिअरने आली पुणे, मुंबईची हार, फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 16:01 IST

गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सवादरम्यान बालाजींच्या चरणी कुरिअरने पुणे, मुंबईची फुले व हार आले.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आशियातील सर्वात मोठी मूर्ती असलेल्या मेहकर येथील शारंगधर बालाजींच्या लोकोत्सवाला १५ वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सवादरम्यान बालाजींच्या चरणी कुरिअरने पुणे, मुंबईची फुले व हार आले. बालाजींच्या विविध पोषाखाने भक्तांना वेगवेगळ्या देवी-देवतांचे दर्शनही घडले.सर्वात मोठे शिल्प व एकाच काळ्या दगडात बनविलेली शारंगधर बालाजी मुर्ती मेहकरसोबतच जिल्ह्याचेही वैभव आहे. मेहकर येथील भगवान शारंगधर बालाजीचे मंदिर शेकडो वर्षांहून जुने आहे. येथील बालाजींचा भक्तवर्ग महाराष्ट्रबरोबरच परराज्यातही आहे. पूर्वी मंदिरातच छोट्या स्वरूपात हा उत्सव पार पडत होता. आता गेल्या १४ वर्षापासून बालाजींचा उत्सव लोकोत्सव झालेला आहे. १ ते १४ डिसेंबर या कालावधीत बालाजी मंदिरात उत्सव पार पडला. या उत्सवाच्या काळात बालाजींसाठी मुंबई, पुणे येथील काही भक्तांनी कुरिअरने वेगवेगळ्या फुलांच्या माळा पाठविल्या. काहींनी बसवर फुलांचे हार पाठविले. तर काही भाविक स्वत: दर्शनासाठी आले. राज्यभरातून येथे भाविकांनी हजेरी लावली. दररोजच्या वेगवेगळ्या आभूषणांनी बालाजींना सजविण्यात आले. वारनिहाय देवी-देवतांचे पोषाख बालाजींना घालण्यात आले. भाविकांनाही आपसुकच वेगवेगळ्या देवतांच्या दर्शनाचा लाभ बालाजींच्या रुपाने घेता आले.मनमोहक रुप

वारनिहाय पोषाख व सोने, चांदी आभूषणांनी सजविलेले बालाजींचे मनमोहक रुप भाविकांचे लक्ष वेधणारे होते.

असा होता पोषाख

रविवारी सुर्यनारायण, सोमवारी भगवान शंकरजी, मंगळवारी जगदंबा देवी, बुधवारी विठ्ठल, गुरूवारी दत्तात्रय, शुक्रवारी बालाजी, शनिवारी नृसिंहाचा पोषाख बालाजींना होता. मंगळवारी मिरवणूक काढण्यात आल्याने महापोषाखात बालाजींचे दर्शन भाविकांना झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरsharangdhar balaji, mehekarशारंगधर बालाजी मेहकर