शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात केवळ ७0५ जणांची विवाह नोंदणी

By admin | Updated: May 15, 2015 23:43 IST

बुलडाणा नगरपालिकेत विवाह नोंदणी करण्याबाबत अनास्था, जनजागृती होणे गरजेचे.

बुलडाणा : विदेशात जाण्यासाठी आवश्यक असणारा पासपोर्ट, विविध शासकीय दाखले मिळविण्यासाठी आवश्यक असलेले विवाह नोंदणी पत्न देण्याचे अधिकार असलेल्या येथील नगरपालिका कार्यालयात पाच वर्षात अवघ्या ७0५ जणांनी विवाह नोंदणी केलेली आहे. नगरपालिका कार्यालयात प्रत्येकाची जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी करणे कायद्याने सक्तीचे केले आहे. नगरविकास विभागाकडून विवाह नोंदणीचे अधिकार नगरपालिकेला दिलेले आहेत. बुलडाणा शहरातून परदेशात जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. परदेश दौरा करण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. विविध शासकीय दाखले, राजपत्नात नाव नोंदणीसाठी, एवढेच नव्हे घटस्फोटासाठीसुद्धा विवाह नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. बुलडाणा शहरात प्रत्येक वर्षी धुमधडाक्यात शेकडो विवाह होतात. लग्नकार्यासाठी लाखो रुपयांचा खर्चही होतो; परंतु विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष केले जाते. तीच परिस्थिती ग्रामीण भागातही आहे. विवाह नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी त्या-त्या ग्रा.पं.चे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याधिकारी आदींनी विवाह नोंदणीचे महत्त्व पटवून देऊन विवाह नोंदणीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे; मात्र पाच वर्षात ७0५ जणांनी विवाह नोंदणी केलेली आहे, अशी माहिती विवाह नोंदणी विभागातील गजनन बदरखे, मुळे यांनी दिली.