शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पाच वर्षांपासून रखडली डोंगरखंडाळा पाणीपुरवठा योजना! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:17 IST

बुलडाणा: तलावावरून पाणी देण्यास वरवंडच्या लोकांनी  केलेला विरोध यामुळे पाच वर्षांपासून मंजूर झालेली  डोंगरखंडाळा येथील महाजल पाणीपुरवठा योजना अद्यापही  रखडलेलीच आहे. कायम पाणीटंचाईचा सामना करणार्‍या  डोंगरखंडाळा गावात सध्या भीषण पाणी समस्या उद्भवलेली  असून, शासनाने यासंदर्भात त्वरित हस्तक्षेप करून या योजनेचे  काम सुरू करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन  छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाई ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तलावावरून पाणी देण्यास वरवंडच्या लोकांनी  केलेला विरोध यामुळे पाच वर्षांपासून मंजूर झालेली  डोंगरखंडाळा येथील महाजल पाणीपुरवठा योजना अद्यापही  रखडलेलीच आहे. कायम पाणीटंचाईचा सामना करणार्‍या  डोंगरखंडाळा गावात सध्या भीषण पाणी समस्या उद्भवलेली  असून, शासनाने यासंदर्भात त्वरित हस्तक्षेप करून या योजनेचे  काम सुरू करावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन  छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. डोंगरखंडाळा येथील तलावाचे पाणी पिण्यास योग्य नसल्याने  तसेच गावात कायम असलेली पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई  लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायतीने पाठपुरावा केल्याने  महाराष्ट्र शासनाने २00९ मध्ये डोंगरखंडाळा येथे २ कोटी ८0  लाख रुपये खर्चाची महाजल पाणीपुरवठा योजना मंजूर केली.  २0१२ ला महाजल योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात  करण्यात आली. या योजनेंतर्गत डोंगरखंडाळा ते वरवंड तलावा पर्यंत ३ कि.मी. ची पाइपलाइन, तलावातील बुडीत क्षेत्रात दोन  विहिरी खोदण्यासह फिल्टर प्लॅन्ट, पाण्याची टाकी या कामांचा  समावेश आहे. दरम्यान, गावाला त्वरित पिण्याचे पाणी मिळावे  म्हणून बुलडाणा अर्बन परिवाराने फिल्टर प्लॅन्ट व पाण्याची  टाकी बांधण्यासाठी जागा दान दिली. दरम्यान, सदर योजनेचे  काम सुरू झाले. वरवंड तलावापर्यंत पाइपलाइन टाकण्यात  आली, फिल्टर प्लॅन्ट व पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाले;  मात्र त्यानंतर वरवंड ग्रामस्थांनी शेजारधर्माचे पालन न करता  केवळ विरोधाची भूमिका घेऊन तलावावरून पाणी देण्यास  नकार दिला. एवढय़ावरच न थांबता वरवंडच्या लोकांनी या  योजनेत सातत्याने अडथळे आणले, ठिकठिकाणी पाइपलाइन  फोडण्यात आली, तलावातील पडीत जमिनीवर ज्ॉकवेल व  इनटेजवेल विहिरींच्या बांधकामालाही विरोध केला. या सर्व  प्रकारामुळे २0१३ पासून ठेकेदाराने सदर योजनेचे काम अर्धवट  सोडले. आजही ही सर्व कामे अर्धवट व रेंगाळलेल्या अवस्थेत  असल्याने डोंगरखंडाळा येथील पाणी समस्या अत्यंत जिकिरीची  झाली आहे.

वरवंड ग्रामस्थांनी अडवलेले पाणी यामुळेच डोंगरखंडाळा ये थील पाणीपुरवठा योजना रखडली आहे. सध्या गावात तीव्र  पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी कमी पाऊस व कायम  पाणीटंचाई असणार्‍या डोंगरखंडाळा येथे आजही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी  करून या योजनेचे काम तत्काळ सुरू करावे.- मालती किशोर चांडकसरपंच, डोंगरखंडाळा.

वरवंडच्या नागरिकांनी तलावातील बुडीत क्षेत्रात ज्ॉकवेल व  इंटेजवेलच्या विहिरी खोदण्यास विरोध केला, जागोजागी पाई पलाईन फोडली. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मु ख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदने दिली; मात्र काहीच निष्पन्न  झाले नाही. जिल्हा प्रशासनाने या कामाला पोलीस संरक्षण द्यावे  व तत्काळ काम सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याशिवाय  पर्याय नाही. - साहेबराव छोटू चव्हाणअध्यक्ष, महाजल पाणीपुरवठा समिती