शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू ; ६३४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:31 IST

Corona cases in Buldhana २१४४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६३४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २७७८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २१४४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६३४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ५०० व रॅपीड टेस्टमधील १३४ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ५५५, तर रॅपिड टेस्टमधील १५८९ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा शहर ९५, तालुक्यातील रायपूर, पांगरी, सव, ढालसावंगी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. मोताळा तालुक्यातील मुर्ती, धामणगाव बढे, धोनखेडा, टेंभी येथे तीन रुग्ण आढळून आले आहेत. खामगांव शहरात ३९, तालुक्यातील सुटाळा तीन, कोलोरी, आमसरी, नागापूर येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. शेगांव येथे पाच, चिखली शहरात ३१, तालुक्यातील  खैरव, उंद्री, बेराळा, शेलगांव आटोळ, तेल्हारा, शेलोडी, अंचरवाडी येथे प्रत्येकी एक, अमडापूर  व बोरगांव काकडे तीन, मलकापूर शहर तीन, देऊळगाव राजा शहरात २९, सिंदखेड राजा शहरात १४, साखरखेर्डा येथे १५, नाव्हा येथे एक, मलकापूर पांग्रा दोन, मेहकर शहरात ४७, हिवरा आश्रम आठ, डोणगांव पाच, लव्हाळा पाच, संग्रामपूर शहरात एक, जळगांव जामोद शहरात एक, नांदुरा शहरात १०, वडनेर येथे ५५, लोणार शहरात १६, बिबी येथे ४, मांडवा पाच, मातमळ १०, कुऱ्हा चार, किन्ही सात, बोरी काकडे आठ, धायफळ चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा