स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होत असलेल्या तपासण्यांमध्ये दररोज किमान १० ते १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडताना दिसून येत आहे.
जगभर कोरोना महामारीमुळे हाहाकार माजला असताना, त्यातून ग्रामीण भागही सुटताना दिसत नाही़. शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस जास्त होताना दिसत आहे.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होण्यासाठी व स्थानिक नागरिकांकडून योग्य खबरदारी घेण्यासाठी पोलीस, महसूल , आरोग्य प्रशासन आदी सर्व घटकांनी एकत्रित मिळून प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे़ यासंदर्भात स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघ यांनी नागरिकांनी वेळोवेळी हात धुवावेत, मास्क लावावा, कुठल्याही परिस्थितीत गर्दी करू नये व जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.