शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सांडव्यात अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 10:38 IST

कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा सोमवारी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात वेगवेगळ््या घटनेत पाच जण बुडाले आहेत. त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध घेण्यात येत आहे. खामगाव तालुक्यातील माक्ता कोक्ता येथील बापलेकांसह तिघे जण तर देउळगाव माळी येथील एक जण तर रामपूर येथील एकाचा यामध्ये समावेश आहे.कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा सोमवारी मृत्यू झाला.देऊळगाव माळी येथील कोराडी प्रकल्प हा शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे, सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग होत आहे. सोमवारी सकाळी कोराडी प्रकल्पावर आलेल्या काही युवकांनी या सांडव्यात पोहण्यासाठी उड्या घेतल्या.यापैकी शुभम दिनकर गवई(२२), संतोष सुखदेव माने (१८), विजयानंद किसन कुडके (२२), सलमान जाकीर पठान(२२), गोपाळ दत्ता जाधव(१८) राहणार देऊळगाव माळी या पाच अडकले होते. पाण्याच्या अति दाबामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यांनी नदीपात्रातील सांडव्याच्या खाली असलेल्या झाडाझुडपांचा आधार घेतला होता. ही बाब प्रकल्पावर फिरायला आलेल्या काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करून ग्रामस्थांना प्रकल्पावर बोलावले. अडकलेल्या युवकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सकाळी सहाला सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये अडकलेल्या युवकांना वाचविण्यासाठी आलम खाँ पठाण, मोहन विश्वनाथ मगर, विजय पुरुषोत्तम सुरुशे , अखिल खाँ पठाण , ऋषी चाळगे यांच्यासह गावातील इतर तरुणांनी प्रयत्न सुरू केले होते. या दरम्यान या प्रकरणाची माहिती मेहकर प्रशासनाला दिल्यावर तात्काळ मेहकर चे तहसीलदार डॉ. संजय गरकल, ठाणेदार आत्माराम प्रधान ,उपविभागीय अधिकारी गणेश राठोड हे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत बचाव मोहिम सुरू होती. जवळपास साडेसात तास चाललेल्या या मोहिमेदरम्यान अडकलेला युवकांना सवाचविण्यात यश आले. मात्र यादरम्यान युवकांना वाचवण्यासाठी ज्या युवकांनी प्रयत्न केले त्यामधील विजय पुरुषोत्तम सुरुशे या युवकांचा मृत्यू झाला.त्यामुळे, गावात हळहळ व्यक्त होत आहे. तिघांना वाचिण्याच्या प्रयत्नात विजय सुरूशे या युवकाला आपले प्राण गमावावे लागले.प्रकल्पांवर जाण्यास मनाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकर