शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात पाच कोरोनाबाधीतांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 11:11 IST

CoronaVirus in Buldhana मंगळवारी तब्बल पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना संसर्गाचे संकट अद्यापही टळले नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरेना बाधीतांची संख्या संख्या सध्या घटत असली तरी मंगळवारी तब्बल पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना संसर्गाचे संकट अद्यापही टळले नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी २५ जण कोरोना बाधीत आढळून आले.दरम्यान, मृत्यू पावलेल्यांमध्ये  धाड येथील ४५ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा शहरातील जिजाऊनगरमधील  ५५ वर्षीय व्यक्ती, सागवन येथील ३५ वर्षाचा व्यक्ती, देऊळगाव मही येथील ७३ वर्षीय व्यक्ती तर शेगाव तालुक्यातील जलंब येथील ९१ वर्षाच्या व्यक्तीचा मृतामध्ये समावेश आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नव्हता. त्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र १३ आॅक्टोबर रोजी एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाचे संकट अद्याप संपले नसल्याचे स्पष्ट होत आहे.दुसरीकडे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व रॅपीड टेस्टद्वारे तपासणी करण्यात आलेल्या २४५ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी २२० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर  २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये सावखेड नागरे येथील एक, देऊळगाव मही येथील चार, चिखली येथील एक, मेरा बुद्रूक येथील एक, निंबारी येथील एक, मलकापूर शहरातील एक, शारा येथील एक, लोणारमधील एक, मेहकर दोन, उकळी तीन, हिवरा आश्रम एक, घाटपुरी एक, खामगाव सहा, नांदुरा एक, या प्रमाणे कोरोनाबाधीत आढळून आहे.दरम्यान, कोरोनावर मात करणाऱ्या ९१ जणांना मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये बुलडाणा आयुर्वेदिक महाविदलयाच्या कोवीड केअर सेंटरमधून ३५, अपंग विद्यालयाच्या सेंटरमधून दहा, खामगाव एक, नांदुरा सात, देऊळगाव राजा नऊ, चिखली एक, लोणार १२, सिंदखेड राजा दहा आणि मेहकर येथील कोवीड केअर सेंटरमधून सहा जणांना सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा