शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकाच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 15:01 IST

मेहकर: जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना १२ जून २०११ मध्ये घडली होती. याप्रकरणी ९ एप्रिल रोजी भुसावळ येथील न्यायालयात पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना १२ जून २०११ मध्ये घडली होती. याप्रकरणी ९ एप्रिल रोजी भुसावळ येथील न्यायालयात पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी मंगळवारी हा निकाल दिला.मेहकर आगाराची बस (क्रमांक एमएच-४०-एन-८७९२) ही जळगाव ते लोणार जात होती. या बसचा फुलगाव फाट्याजवळ भुईमुगाचा पाला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धक्का लागला, असा आरोप करून ट्रॅक्टरवरील समाधान भास्कर कोळी (रा. अंजनसोडा), प्रमोद इंगळे, सुरेश देवराम पाटील, संदीप ऊर्फ मनू रामा इंगळे (सर्व रा. ओझरखेड) व जयेश सारंगधर पंडित पाटील (रा. साकेगाव) यांनी एसटी बसला वरणगाव येथील देशमुख पेट्रोल पंपाजवळ ओव्हरटेक करून बस अडवली. यानंतर बसचालक प्रकाश नारायण मस्के (४०, रा. पर्तापूर, ता. मेहकर) यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी बसवाहक वैभव माणिकराव शिरसाट यांनी वरणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. यावरून पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र उपचारादरम्यान बसचालक प्रकाश मस्के यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वरणगाव पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात नऊ साक्षीदार तपासण्यात आले, तर डॉ. पंकज सैदाणे यांनी शवविच्छेदन केले होते. आरोपींविरुद्ध साक्षीदार महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे या पाचही आरोपींना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप