शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गव्हाच्या अफरातफरप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 02:14 IST

खामगाव :  येथील रेशन गहू अफरातफरप्रकरणी पोलिसांनी पुरवठा कंत्राटदारासह गोदाम व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी पहाटे या प्रकारामुळे अवैध रेशन माफियासोबतच पुरवठा विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे. यामध्ये तीन आरोपी अटकेत असून, पुरवठा कंत्राटदार आणि गोदाम व्यवस्थापक फरार आहेत

ठळक मुद्देरेशन माफियासोबतच पुरवठा विभागातील अधिका-यांचे धाबे दणाणले तीन आरोपी अटकेत असून, पुरवठा कंत्राटदार आणि गोदाम व्यवस्थापक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  येथील रेशन गहू अफरातफरप्रकरणी पोलिसांनी पुरवठा कंत्राटदारासह गोदाम व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी पहाटे या प्रकारामुळे अवैध रेशन माफियासोबतच पुरवठा विभागातील अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. यामध्ये तीन आरोपी अटकेत असून, पुरवठा कंत्राटदार आणि गोदाम व्यवस्थापक फरार आहेत.रेशनच्या गव्हाची वाहतूक करणाºया ट्रकमधून ७ कट्टे उतरवून दुसºया वाहनात टाकल्या जात असल्याचा  प्रकार मंगळवारी खामगावात उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांसह दोन वाहनांना  चिखली बायपासवरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी महसूल प्रशासनाला पत्र देत, पकडण्यात आलेला धान्यसाठा नेमका कुणाचा? यासंदर्भात  विचारणा करण्यात आली.  रात्री उशिरा तहसीलचे निरीक्षण अधिकारी गजानन बाळकृष्ण चव्हाण यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी  ट्रकचालक सय्यद इरफान सय्यद आलम (३८, रा. डोंगरगाव ता. कारंजा जि. वाशिम), शेख नदीम शेख नईम (२२) आणि हसन खान हुसेन खान ( ३०, दोघेही रा. बर्डे प्लॉट खामगाव) यांच्यासह वाहतूक कंत्राटदार राजू गुप्ता  आणि गोदाम व्यवस्थापक जी. एस. देशपांडे यांच्या  विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

करारनाम्यातील तरतुदीनुसार कंत्राटदारावर कारवाई!सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्य उपलब्धतेच्या हमीकरिता निश्चित केलेल्या सुधारित वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाहन कंत्राटातील तरतुदीनुसार वाहतुकीदरम्यान वाहतूक कंत्राटदाराचे प्रतिनिधी, चालक, वाहक यांच्याकडून होणाºया कोणत्याही प्रकारच्या अफरातफर/ काळ्या बाजारास सर्वस्वी वाहतूक कंत्राटदारास जबाबदार धरण्यात येईल, अशी तरतूद आहे. त्या आधारे वाहतूक करणाºया कंत्राटदारास याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. पोलीस तपासात असहकार्य आणि वाहतूक कंत्राटदाराशी हातमिळवणीच्या संशयावरून गोदाम व्यवस्थापक जी. एस. देशपांडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगाव