बुलडाणा : ऑक्टोबरच्या तिसर्या आठवड्यात शासकीय कर्मचार्यांनी सुट्यांची जबरदस्त लयलूट केली. ती कमी झाली म्हणून की काय, येत्या नोव्हेंबरच्या १0 दिवसांत कर्मचार्यांना दिवसाआड सुटी उपभोगण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांतील कामकाज पुन्हा मंदावणार आहे. १ नोव्हेंबरचा शनिवार गेला की २ ला रविवारची सुटी, ३ तारखेचा सोमवार गेला की मंगळवारी ४ तारखेला मोहरमची सुटी, ५ तारीख गेली की गुरुवारी ६ तारखेला गुरुनानक जयंतीची सुटी, शुक्रवार गेला की शनिवारी दुसर्या शनिवारची सुटी आणि लगेच ९ नोव्हेंबरला रविवार असल्याने ती सुटी. म्हणजे आठ दिवसांत पाच सुट्या अशी अवस्था आहे. अनेक नोकरदार या पाच दिवसांच्या सुटीचे रूपांतर आठ दिवसांच्या सुटीत करण्यासाठी हुकुमी आजारी पडण्याच्या तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. बँकांचे व्यवहार यामुळे थंडावण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरचा पहिला आठवडा सुटीचा
By admin | Updated: October 29, 2014 00:11 IST