शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:44 IST

Buldhana News Marathi: आजाराचे लक्षणे दिसताच त्वचाविकाराचा संसर्ग होत असल्याची शंका निर्माण झाली होती; मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप  करून तपासणी केली.

Buldhana latest news: बुलढाणा जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांपासून केसगळती आणि त्यानंतर नखगळतीचे प्रकार समोर आल्यानंतर, आता मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख या सुमारे ५,५०० लोकसंख्येच्या गावात हाताला भेगा पडण्याच्या तक्रारी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आजाराचे लक्षणे दिसताच त्वचाविकाराचा संसर्ग होत असल्याची शंका निर्माण झाली होती; मात्र जिल्हा आरोग्य यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप  करून तपासणी केली आणि हा आजार संसर्गजन्य नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 

एकीकडे केस व नख गळतीच्या प्रकारांबाबत अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसतानाच या नवीन प्रकारामुळे गावात संभ्रम निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा निवास असलेल्या तालुक्यातच हा प्रकार आढळल्याने आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला. 

या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी जिल्हा साथरोग व सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रट, स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी मिश्रा यांनी तपासणी केली. 

'ऑटो इम्यून' स्वरूपाचा आजार

आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा आजार संसर्गजन्य नसून 'ऑटो इम्यून' स्वरूपाचा आहे. याचा अर्थ, शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा स्वतःच्या त्वचेविरोधात प्रतिक्रिया देते, विशेषतः जेव्हा ती डिटर्जंट, रसायने, साबण, कीटकनाशके यांसारख्या घटकांशी संपर्कात येते. पाण्याचा या आजाराशी कोणताही थेट संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कशामुळे होतोय हा आजार?

पामो-प्लांटर एक्झिमा' किंवा 'केराटोडर्मा' हे आजार दीर्घकालीन स्वरूपाचे असतात. त्यांचे पूर्णपणे बरे होणे शक्य नसले, तरी उपचारांद्वारे त्यांना नियंत्रणात ठेवता येते. विशेषतः रासायनिक सवयी, घरगुती डिटर्जंट आणि अलर्जीक घटक टाळल्यास लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा होते. यासोबत योग्य मलमे व जीवनशैलीतील बदल गरजेचे असतात, असे त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रट यांनी सांगितले. 

जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे म्हणाले, "कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर, साबण, डिटर्जंट, तसेच शेतीतील रसायनांपासून हातांचे संरक्षण आवश्यक आहे. लक्षणे दिसताच त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा." 

 

टॅग्स :Healthआरोग्यbuldhanaबुलडाणा