शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील पहिली शवदाहिनी खामगावात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:54 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पहिली विद्युत शवदाहिनी खामगाव येथे आणण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: हिंदू संस्कृतीत मनुष्यावर मृत्यूनंतर पारंपारीक लाकडाच्या साहाय्याने अंतिम म्हणजेच अग्नीसंकार करण्यात येतात. मात्र, लाकडांची असलेली कमतरता आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने आधुनिक युगात आता अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनीचा उपयोग केल्या जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पहिली विद्युत शवदाहिनी खामगाव येथे आणण्यात आली आहे.खामगाव शहरात हिंदू धर्मियांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन स्मशानभूमी आहेत. यामध्ये चिखली रोडीवरील ओंकारेश्वर स्मशानभूमी आणि रायगड कॉलनीतील मुक्तीधाम स्मशानभूमीचा समावेश आहे. या दोन्ही स्मशानभूमीत आतापर्यंत हिंदू रितीरिवाज आणि संस्कृतीनुसार लाकडे जाळून अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र, या पध्दतीत पर्यावरणाचा ºहास आणि वेळ जास्त लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आधुनिकतेची कास धरत आता खामगावातील मुक्तीधाममध्ये शहरातील एका सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आधुनिक शवदाहिनी उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये पालिका प्रशासन, आ. अ‍ॅड. आकाश फुंडकरांनी सहकार्य केले. ३० लक्ष रुपये खर्चाच्या या शवदाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे.जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी!खामगाव येथील मुक्तीधाम स्मशानभुमीतील अत्याधुनिक शवदाहिनी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. या शवदाहिनीत शव ठेवण्यात आल्यानंतर अवघ्या दोन तासात विधिवत पध्दतीने शवाचे दहन होईल. तसेच या दाहिनीतून निघणारा धूर फिल्टर होऊन निघेल. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल.

 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा