बुलडाणा : शहराच्या मध्यभागी असलेल्या गुप्ता नगरपालिका शाळेच्या आवारात दिवाळी निमित्त थाटण्यात आलेली फटाक्यांची दुकाने शहर परिसरासाठी धोकादायक ठरली आहेत. दुकाने थाटण्यासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शहराच्या मध्यभागी असलेल्या गुप्ता नगरपालिका प्राथमिक शाळेच्या परिसरात फटाक्याची दुकाने थाटण्यात आली आहेत. जवळपास ५0 दुकानांना शासनाच्या नियमाचे पालन केल्याच्या अटीनुसार सदर दुकानांना १८ ते २४ ऑक्टोेंबर दरम्यान फटाके विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी नगरपालिकेने प्रत्येकी दुकान २३00 रूपये प्रमाणे टॅक्स घेवून परवानगी देण्यात आली आहे. परंतु पालिकेतर्फे कोणतीही सुरक्षीतता दिली नाही. फटाक्यांच्या दुकानाच्या मध्यभागी पाण्याची टँकर ठेवण्यात आले असून दुकानापासून काही फुट अंतरावर पालिकोचे अग्निशमन दलाची गाडी उभी करण्यात आली आहे. याशिवाय कोणतीही सुरक्षीतता देण्यात आली नाही. याशिवाय फटाका दुकानदारांनी अटींचे पालन केले आहे की नाही, याबाबात पालिकेने कोणतीही शहानिशा केलेली नाही. त्यामुळे शहराच्या मध्यभागी असलेला परिसरात फटाक्यांच्या दुकानामुळे धोकादायक बनला आहे.
फटाका दुकाने शहरासाठी धोकादायक
By admin | Updated: October 23, 2014 00:10 IST