खामगाव (बुलडाणा) : अंगणात मनमोहक, आकर्षक रांगोळी, रंगीबेरंगी फटाक्यांची उधळण तसेच अंगणात दिवे लावून, लक्ष्मीची पूजा करून शहरात लक्ष्मीपूजनाने दिवाळी धूमधडाक्यात, हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. दीपावलीनिमित्त शहरात चैतन्य, उल्हासाचे वातावरण होते. दीपावलीच्या दिवशी सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीदारांची गर्दी उसळली होती. दारी तसेच गाड्यांना झेंडूचे तोरण बांधण्यासाठी झेंडूंच्या फुलांना, आंब्याच्या पानांना मोठी मागणी होती. सुभाष चौक तसेच मुख्य बाजारपेठेत झेंडूची फुले विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. विविध वस्तू विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने, प्रमुख रस्त्यांवर चालायलाही जागा नव्हती. रस्ते गदीर्ने फुलले होते. तर सायंकाळी फटाके फोडण्याची धूम सुरू होती.
आसमंतात कोट्यवधींच्या फटाक्यांची आतषबाजी
By admin | Updated: October 24, 2014 23:16 IST