शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

अग्निशमन वाहन गैरव्यवहार; वसुलीचा आदेश

By admin | Updated: March 6, 2017 01:47 IST

तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचा-यांकडून होणार वसुली

मलकापूर, दि. ५- नगरपालिकेत अग्निशमन वाहन दुरुस्तीप्रकरणी गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध होत, गैरव्यवहारातील रकमेप्रकरणी तत्कालीन ३२ पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर रक्कम वसूलपात्र ठरविण्यात आली आहे. वसुलीची कारवाई तत्काळ पूर्ण करण्यात यावी. अधिकारी, कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी व प्रस्तुत भार-अधिभार प्रकरण पूर्णत: निकाली काढण्यात यावे, असा आदेश ३ मार्च रोजी अमरावती विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी काढला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अग्निशमन वाहन दुरुस्तीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी नगर परिषद मलकापूर येथील भार-अधिभारची रक्कम वसुलीसंदर्भात जबाबदार पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांचे वारसदारांना ८ नोव्हेंबर २0१६ व १५ डिसेंबर २0१६ रोजी नोटिस बजावून सुनावणीकरिता उपस्थित राहून तत्सम अभिलेखासह लेखी जबाब दाखल करण्यास सुचित करण्यात आले होते. सुनावणीनंतर जबाबदार अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांच्यावर वसूलपात्र रक्कम ठरविण्यात आली आहे. त्यानुसार तत्कालीन अध्यक्ष वल्लभदास जगन्नाथ पुरोहित, सदस्य रा.ल. खेर्डीकर, रमाकांत जानकीराम पाटील, डी.एम. जाधव, इ.म. चव्हाण यांच्याकडून प्रत्येकी २७,८५३.७५ रुपये, तर त्यानंतरचे तत्कालीन अध्यक्ष त्रिवेणी चिरंजीलाल गांधी, उपाध्यक्ष रशीदखॉ युसुफखॉ, सदस्य बशीरखॉ फरीदखॉ, श्रीमती फरीदाबी असमतखॉ, श्रीमती जुलैखाबी सलामखॉ, अ.मजीद अ.कदीर, पांडुरंग मोतीराम चिम, विजयराव जगन्नाथराव जाधव, विजया अनिल जैस्वाल, अतुल विजुभाई पटेल, वर्षा विजय सातव, गोदावरी अर्जुन ढोलकर, एजाज किबरीयाखॉ मकसूद अलीखॉ, त्र्यंबक लक्ष्मण चोपडे, म.फारूक शे.अमीर, छाया राजेंद्रसिंह दीक्षित, नामदेव नारायण पाटील, एकनाथ प्रल्हाद दीपके, जयराज जगन्नाथराव जाधव, श्रीमती नलिनी प्रभाकर ठाकरे, आरोग्य विभागप्रमुख आर.बी. जैन यांच्याकडून प्रत्येकी ३१७६९ रुपये, तर तत्कालीन मुख्याधिकारी वाय.बी. डांगे ८,४४३ रुपये, विभागप्रमुख बी.के. गौर यांच्याकडून १,८७,४२९ रुपये, लेखापाल श्रीपाद देशपांडे ८,४४२ रुपये, मुख्याधिकारी व्ही.बी. दातीर १,७६,१२३ रुपये, लेखापाल किशोर तारकसे १,८७,८६४.५0 रुपये व मुख्याधिकारी व्ही.एच. गोरे ३१,00२.५0 रुपये, अशी एकूण १४,0५,५४१.७५ रुपये सुनावणीनंतर वसूलपात्र रक्कम ठरविण्यात आली आहे. आता गंभीर स्वरूपात झालेल्या वित्तीय अनियमिततेसाठी जबाबदार तत्कालीन मुख्याधिकारी व्ही.बी. दातीर, बी.आर. गुळवे, कर निरीक्षक एन.के. खान, कर लिपिक एम.जी. कंडारकर, प्रमोद पाठक, कर निरीक्षक एन.के. खान, कर लिपिक ज.ना. सातव या सात जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांच्यावर व्यक्तीश: जबाबदारी निश्‍चित करण्यात आली असून, प्रशासकीय कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सात नावे वसूलपात्र यादीतून वगळण्यात आलीयामध्ये मात्र तत्कालीन सदस्य सरदारमल मोहनलाल संचेती, अनिल मोतीलाल जैस्वाल, सलामखॉ युसुफखॉ यांनी २७,८५३.७५ तर अँड.मजीद कुरेशी ४४,६00 रुपये, अँड.मजीद कुरेशी २४,२८८ रुपये, गजानन वामन सोमण ३१,९७६, तत्कालीन मुख्याधिकारी डी.जी. अंभोरे ३१,९७६ असे एकूण २,१६,४00.५0 रुपये रक्कम या जबाबदार अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांनी प्राथमिक जबाबदारी निश्‍चित केलेल्या पदाधिकारी, अधिकारी व त्यांचे वारसदारांनी त्यांच्यावर निश्‍चित केलेली सदर रक्कम नगर परिषद मलकापूर येथे भरणा केल्याची पावती व मुख्याधिकारी यांचा अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे या सात पदाधिकारी व अधिकारी या आक्षेपार्थींंंंनी वसूलपात्र रकमेचा भरणा नगर परिषदेस जमा केला असल्यामुळे उपरोक्त सात नावे वसूलपात्र यादीतून वगळण्यात आली आहे, हे विशेष!