वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यातील टुणकी येथील गादी कारखान्याला शनिवारी आग लागली. नाजीम सौदागर मालकीच्या गादी कारखाना आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे गादी कारखान्याची राख-रांगोळी झाली असून सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाला आहे. शे.रेहान नाजीम सौदागर असे जखमी मुलाचे नाव असून, त्याला पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे.
टुणकी येथील गादी कारखान्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 13:49 IST