सिंदखेड राजा : साखरखेर्डा येथील एका कृषी केंद्राला आग लागून ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता घडली. दरम्यान, गावातील काही पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळुन खाक झाले होते. चिखली येथील गोविंद पुरूषोत्तम गुळवे यांचे साखरखेर्डा येथे त्रीमुर्ती अॅग्रो सर्व्हिस सेंटर आहे. गुरूवारला सकाळी सहा वाजेदरम्यान या कृषी केंद्राला अचानक आग लागली. दुकानला आग लागल्याचा प्रकार सकाळी रस्त्याने फिरायला जात असलेले साखरखेर्डा येथील कोंडीबा जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी दुकान मालकांसह पोलीस स्टेशनला कळविला. तेंव्हा तत्काळ गावातील सर्व पाण्याचे टँकर बोलाविण्यात आले. परंतू आग आटोक्यात येईपर्यंत दुकानातील स्पींक्लर पाईप, खत, औषधी, दोन संगणक व इतर साहित्य जळून खाक झाले. यामध्ये जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
साखरखेर्डा येथील कृषी सेवा केंद्राला आग; ५० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 14:21 IST
सिंदखेड राजा : साखरखेर्डा येथील एका कृषी केंद्राला आग लागून ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता घडली.
साखरखेर्डा येथील कृषी सेवा केंद्राला आग; ५० लाखांचे नुकसान
ठळक मुद्देगुरूवारला सकाळी सहा वाजेदरम्यान या कृषी केंद्राला अचानक आग लागली.साखरखेर्डा येथील कोंडीबा जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी दुकान मालकांसह पोलीस स्टेशनला कळविला. आग आटोक्यात येईपर्यंत दुकानातील स्पींक्लर पाईप, खत, औषधी, दोन संगणक व इतर साहित्य जळून खाक झाले.