शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे फायर ऑडीट पूर्णत्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 23:00 IST

Fire Audit of Hospital मदतीला धावलेल्या ‘देवदूता’नेच रूग्णालयातील फायर आॅडीट आणि अद्ययावत यंत्रणेचा खर्च केला आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातील फायर आॅडीट अखेरीस सामाजिक दातृत्वातून पूर्णत्वास नेण्यात आले. कोरोना संकट काळात उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या मदतीला धावलेल्या ‘देवदूता’नेच रूग्णालयातील फायर आॅडीट आणि अद्ययावत यंत्रणेचा खर्च केला आहे. मात्र, प्रसिध्दीपासून दूर राहण्यासाठी नामोल्लेख टाळण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे येथे उल्लेखनिय!

जानेवारी महिन्यात भंडारा येथील नवजात शिशू विभाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयातील फायर आॅडीटचा मुद्दा ऐरणीवर आला. दरम्यान, खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करण्यात आल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती येथून फायर आॅडीटकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयाने सामाजिक दातृत्वातून आलेल्या निधीतून फायर आॅडीट पूर्ण केले आहे.  फायर आॅडीट दरम्यान, नवजात शिशू विभागातील उणिवा दूर करताना, खामगाव येथील रूग्णालयात दोन आपातकालीन दरवाजेही ताबडतोब बसविण्यात आले. यासाठी उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाकडून खर्च करण्यात आला.

 ‘देवदूत’ धावला नवजात शींशूच्या मदतीला!- कोरोना संक्रमण कालावधीत खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात अत्याधुनिक कोरोना टेस्टींग लॅब उभारणीसाठी झटणाºया आणि लक्षावधी रूपयांची मदत करणाºया ‘देवदूता’च्या दातृत्वातूनच खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे फायर आॅडीट पूर्ण झाले. दातृत्वातून फायर आॅडीट पूर्णत्वास  आलेले खामगाव येथील राज्यातील एकमेव रूग्णालय आहे. २२ आॅटोमॅटीक अलार्मही बसविले!-भंडारा येथील घटनेचा बोध घेत, राज्यातील विविध शासकीय रूग्णालयातील नवजात शिशू विभागातील यंत्रणेचा धांडोळा घेतला जात आहे. वार्मरमधील शॉर्ट  सर्कीटमुळे ही दुर्देवी घटना घडल्यानंतर सर्वच शासकीय रूग्णालयांचे फायर आॅडीट करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात २२ आॅटोमॅटीक अलार्म  बसविण्यात आले. तसेच एका ठिकाणी मॅन्युअली अलार्म यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली. 

 जानेवारी महिन्यात ६९ बालकांवर उपचार- खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातील इनबॉर्न विभागात ५ वार्मर आहेत. तर आऊट बॉर्न विभागात १२ वार्मर कार्यान्वित आहेत. इनबॉर्न आणि आॅऊटबॉर्न विभागात एकुण २६ नवजात शीशू रूग्ण ठेवण्याची क्षमता आहे. त्याचवेळी स्टेप डाऊन विभागात ४ वार्मर कार्यान्वित आहेत. जानेवारी महिन्यात या रूग्णालयात ६९ बालकांवर उपचार करण्यात आले.

टॅग्स :khamgaonखामगावhospitalहॉस्पिटल