शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आठ जिल्ह्यात विवाह मंडळ शोधण्याची लगीन ‘घाई’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:41 IST

खामगाव:  मुहूर्त  नसल्याने विवाहांची धामधूम ओसरत असतानाच राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विवाह मंडळ शोधण्याची लगीन ‘घाई’ सुरू असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देमहाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि  विवाह नोंदणी नियम १९९९ अनिवार्य आहे.आठ जिल्ह्यांमध्ये एकही नोंदणीकृत तसेच विना नोंदणीकृत मंडळ अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विना नोंदणीकृत विवाह मंडळांची तपशिलवार माहितीच उपरोक्त जिल्हा परिषदांकडे उपलब्ध नसल्याचा विश्वसनिय सुत्रांचा दावा आहे. 

-  अनिल गवई

खामगाव:  मुहूर्त  नसल्याने विवाहांची धामधूम ओसरत असतानाच राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विवाह मंडळ शोधण्याची लगीन ‘घाई’ सुरू असल्याचे दिसून येते. यामध्ये पश्चिम विदर्भातील बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात अस्तित्वात असलेल्या सर्व विवाह मंडळांनी निबंधक विवाह मंडळ व विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ व महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि  विवाह नोंदणी नियम १९९९ अनिवार्य आहे. परंतु, राज्यातील बुलडाणा, धुळे, गडचिरोली, हिंगोली, नंदूरबार, सिंधुदुर्ग, यवतमाळ आणि नव्यानेच अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्यांमध्ये एकही नोंदणीकृत तसेच विना नोंदणीकृत मंडळ अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  दरम्यान, विवाह  नोंदणी मंडळांबाबत  आरोग्य उपसंचालक आरोग्य सेवा तथा निबंधक विवाह मंडळ व विवाह (विभागस्तरीय समन्वय) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून वारंवार पाठपुरावा केल्या जात असल्याने पश्चिम विदर्भातील बुलडाणा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांसह राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी विवाह मंडळ शोध मोहिम  राबविण्यात येत असल्याचे समजते. विश्वसनिय सुत्रांनुसार नोंदणीकृत तथा विना नोंदणीकृत विवाह मंडळांची तपशिलवार माहितीच उपरोक्त जिल्हा परिषदांकडे उपलब्ध नसल्याचा विश्वसनिय सुत्रांचा दावा आहे. 

आरोग्य उपसंचालकांचे पत्र!

जिल्ह्यातील नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत विवाह मंडळांच्या तपशिलवार माहितीसाठी उपसंचालक आरोग्य सेवा तथा निबंधक विवाह मंडळ व विवाह महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून राज्यातील आठ जिल्हा आरोग्य अधिकाºयांना एकाचवेळी पत्र देण्यात आले आहे. यामध्ये बुलडाणा, धुळे, गडचिरोली, हिंगोली, नंदूरबार, पालघर, सिंधुदूर्ग आणि यवतमाळ येथील जिल्हा आरोग्य अधिकाºयांचा समावेश आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाची टाळाटाळ!

नोंदणीकृत विवाह मंडळांची माहिती देण्यासाठी  जिल्हा परिषदांकडून टाळाटाळ केली जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे आठ जिल्हा परिषद प्रशासनाशी आरोग्य उपसंचालकांकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात येत असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून संबंधितांना धारेवर धरल्या जात असल्याचे समजते.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा