शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 10:50 IST

लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने पालक आर्थिक संकटात असतानाही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडून त्यांची लूट सुरू असल्याचे चित्र आहे

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा, महाविद्यालय बंद आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार नसल्याने पालक आर्थिक संकटात असतानाही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडून त्यांची लूट सुरू असल्याचे चित्र आहे. पालकांना फी सक्ती करू नये, अशा शासनाच्या आदेशानंतरही जिल्ह्यातील अनेक शाळा पालकांना फी भरण्यासाठी तगादा लावत आहेत. आॅनलाइन वर्ग सुरू केलेले असतानाही गणवेशाची सक्ती करण्यात येत असल्याने पालक अडचणीत सापडले आहेत.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यात आल्या नसल्या तरी शैक्षणिक सत्राला सुरूवात करण्यात आली आहे. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. सर्वत्र आॅनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतू खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पालकांकडे फी वसूलीसाठी वारंवार तगादा लावल्या जात असल्याच्या ओरड होत आहे. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची मागील वर्षाची व सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करू नये, असे आदेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेले आहेत. परंतू या आदेशाला सध्या जिल्ह्यातील शाळांकडून खो दिल्या जात आहे. मागील वर्षीची फी न भरल्यामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांचे पुढील वर्षातील प्रवेश रोखले असल्याची माहिती आहे. नविन वर्षाच्या फीसाठी सुद्धा फोन करून पालकांना वेठीस धरले जात आहे. काहींनी समोरच्या वर्गात प्रवेश दिला; मात्र आॅनलाइन शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचत नसल्याचे काही पालकांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले आहे.

शाळा बंद, गणवेश कशासाठी?विद्यार्थ्यांचे घरूनच आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. तरीसुद्धा काही शाळा पालकांना गणवेशासाठी पैसे मागत आहेत. शाळा बंद असल्याने व शाळेत जाण्याची गरज नसतानाही गणवेश कशासाठी? असा प्रश्न पालकांमधून उपस्थित होत आहे.

पुस्तकांच्या अवाजवी किंमतीपुस्तकांच्या अवास्तव किंमती पालकांकडून वसूल केल्या जात आहेत. के.जी.वन व केजी टू या वर्गाच्या पुस्तकांसाठी दोन ते अडीच हजार रुपये पालकांकडून घेतले जात आहेत. त्यामध्ये पाच पुस्तके व पाचच वह्या दिल्या जातात. या पुस्तकांची पावती पालकांना दिल्या जात नाही.शिक्षण विभाग बघते तक्रारीची वाट!फी वाढ किंवा कुठल्याही संस्थेने फी भरण्यासाठी सक्ती केल्यास तक्रार करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने समिती नेमलेली आहे. परंतू या समितीकडे दोन महिन्यात एकही लेखी तक्रार आलेली नाही. ज्या शाळेत आपला पाल्य आहे, त्या शाळेची तक्रार करण्यास पालक समोर येत नाहीत. परंतू शिक्षण विभाग तक्रारींची वाट पाहत आहे.

फी वाढीसंदर्भात लेखी तक्रार आलेली नाही. त्यामुळे कारवाई करू शकत नाही. पालकांनी तक्रार निवारण समितीकडे तक्रार करावी. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- एजाज खान, शिक्षणाधिकारी, प्राथमिक बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र