शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

अखेर ‘त्या’ १५ गावांचे टँकरचे प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: April 20, 2017 23:51 IST

राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचा परिणाम

चिखली: जिल्ह्यात अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना व सदर गावातील ग्रामपंचायतीकडून टँकरसंदर्भात प्रस्ताव पाठविल्यावरही केवळ जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचे दर्शविण्यासाठी या गावांचे प्रस्तावाच उशिरा पाठविण्याच्या अजब प्रकाराबद्दल चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे व बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन या प्रश्नी त्यांना धारेवर धरण्याचा प्रकार घडल्यानंतर बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी तडकाफडकी चिखली व बुलडाणा तालुक्यतील पंधरा ग्रामपंचायतींचे टँकरचे प्रस्ताव मंजूर केले आहेत़ जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेन्दिवस उग्र स्वरूप धारण करत आहे. बुलडाणा तालुक्यातील गिरडा, रायपूर, हनुमतखेड, चौथा, गोंधणखेड, देउळघाट, माळविहीर, जांब, शिरपूर व चिखली तालुक्यातील भोगावती, सैलानी नगर, डोंगरशेवली, धोडप, पळसखेड सपकाळ आणि कोलारा या गावात भीषण पाणीटंचाईला नागरिकांना समोरे जावे लागत आहे़ या गावांच्या ग्रामपंचायतीने त्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत आवश्यक त्या कार्यवाहीसह प्रस्ताव मार्च महिन्यातच संबंधित विभागाकडे सादर केले होते; मात्र एप्रिल महिना अर्धा उलटला तरी टँकर मंजूर न झाल्याने या गावातील नागरिकांची होणारी गैरसोय पाहता जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे व आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सदर गावांचे सरंपच, जिल्हा परिषद सदस्य जयश्री शेळके व काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन या प्रश्नी होणारा विलंब व त्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शासन राबवित असलेली जलयुक्त शिवार योजनेची कामगिरी प्रभावी झाल्याचे भासविण्यासाठी गावोगावातून येणारे टँकरचे प्रस्ताव एक महिना उशिरा पाठविण्याचे महसूल विभागाच्या वतीने सुचविण्यात आल्याची बाब पुढे आली़ त्यावर जिल्हाधिकारी यांना धारेवर धरून उभय आमदारांनी लोकांची होणारी गैरसोय त्यांच्या लक्षात आणून दिली़ या भेटीचा परिणाम म्हणूनच जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी तडकाफडकी बुलडाणा व चिखली तालुक्यातील उपरोक्त १५ गावांमधून आलेले टँकरचे प्रस्ताव मंजूर केले आहेत़ दरम्यान, उर्वरित गावासाठीही तातडीने उपाययोजना केल्या जाणार आहे़ यामुळे वरील गावातील पेयजल समस्येची अडचण दूर होण्यास मदत मिळणार आहे.