शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कांदाचाळी आल्या जागेवर; कृषी विभागाच्या बडग्यामुळे कांदाचाळीची पुन्हा उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 13:28 IST

खामगाव: कांदा चाळीच्या अनुदानाचा दुरूपयोग करणाºया लाभार्थ्यांसह कृषी सहाय्यकांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर तालुक्यातील ‘गायब’ झालेल्या तसेच उभारणी करण्यात न झालेल्या कांदाचाळी अखेर आपल्या जागेवर आल्या आहेत. 

ठळक मुद्दे तालुक्यातील काही शेतकºयांनी कांदाचाळीची उभारणी न करताच अनुदान लाटण्यासोबतच अनेक लाभार्थ्यांनी कांदाचाळीची अफरातफर केल्याप्रकरणी कृषी विभागाने ३७ लाभार्थ्यांसह संबधीत कृषी सहाय्यकांना नोटीस बजावल्या होत्या.कृषी विभागाकडून सन २०१६-१७ या आर्थिक वर्षांमध्ये मंजूर झालेल्या कांदाचाळींची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडताळणी कृषी विभागामार्फत कृषी पर्यवेक्षकाद्वारे करण्यात आली. ‘कांदाचाळीच्या उद्देशाला हरताळ!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर कांदाचाळीच्या अफरातफरीचे बिंग फुटले होते.

खामगाव: कांदा चाळीच्या अनुदानाचा दुरूपयोग करणाºया लाभार्थ्यांसह कृषी सहाय्यकांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर तालुक्यातील ‘गायब’ झालेल्या तसेच उभारणी करण्यात न झालेल्या कांदाचाळी अखेर आपल्या जागेवर आल्या आहेत.  तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कांदाचाळीची उभारणी न करताच अनुदान लाटण्यासोबतच अनेक लाभार्थ्यांनी कांदाचाळीची अफरातफर केल्याप्रकरणी कृषी विभागाने ३७ लाभार्थ्यांसह संबधीत कृषी सहाय्यकांना नोटीस बजावल्या होत्या. ‘कांदाचाळीच्या उद्देशाला हरताळ!’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर कांदाचाळीच्या अफरातफरीचे बिंग फुटले होते. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या कृषी विभागाने तातडीने जिल्ह्यातील कांदाचाळीची पडताळणी केली. यामध्ये दोषी आढळलेल्या ३७ शेतकऱ्यांना  कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा साठवणुकीतील नुकसान कमी करण्यासाठी तसेच शास्त्रोक्त पध्दतीने कांदा साठवणूक करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानावर कांदाचाळीचे वितरण करण्यात येत आहे. मात्र, या कांदाचाळीच्या अनुदानाचा जिल्ह्यात दुरूपयोग करण्यात आल्याचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाकडून सन २०१६-१७ या आर्थिक वर्षांमध्ये मंजूर झालेल्या कांदाचाळींची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडताळणी कृषी विभागामार्फत कृषी पर्यवेक्षकाद्वारे करण्यात आली. त्यानंतर दोषी असलेल्या लाभार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली. या तपासणीत चार ठिकाणी कांदाचाळीची उभारणीच झाली नसल्याचेही उघडकीस आले होते. 

अखेर चार शेतकऱ्यांनी केली उभारणी!

कांदाचाळीच्या अनुदानाचा लाभ घेतल्यानंतरही कांदाचाळ न उभारणाºया शेतकऱ्यांनी अखेर कृषी विभागाच्या बडग्यामुळे कांदाचाळीची पुन्हा उभारणी केली आहे. तर उर्वरित ३१ लाभार्थ्यांनी इतरत्र हलविलेल्या कांदाचाळी पुन्हा जैसे थे केल्या आहेत. कांदाचाळीच्या अनुदानाचा दुरूपयोग करणार नसल्याची हमीही या शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडून लेखी घेण्यात आली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती