शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 11:51 IST

१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

बुलडाणा : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष/ सत्राच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दीड तासांचा विद्यार्थ्यांना वेळ देण्यात आला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ५ ऑक्टोबर पासून परीक्षांना सुरूवात होणार आहे. तसेच ही परीक्षा ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. 

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना ५० टक्के प्रश्न सोडवावे लागणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाईलवरून परीक्षा देण्याची सुविधा विद्यापीठाने दिली आहे.दरम्यान, विद्यापीठाने प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी ऑनलाईन लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर विविध महाविद्यलयातील प्राध्यापक प्रश्न तयार करून देत आहेत. ऑनलाईन परीक्षांचे नियोजन पूर्ण झाले आहे. तसेच अभियांत्रिकीचे प्रात्याक्षिक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. इतर शाखांच्या विद्यार्थ्यांचेही प्रात्याक्षिक परीक्षा सुरू झाल्यास असून ३० सप्टेंबरपर्यंत त्या पूर्ण करावे लागणार आहेत. 

नेटवर्कची समस्या विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजन केले असले तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आहे. अनेक गावांमध्ये मोबाईलचे नेटवर्क नसल्याने परीक्षा द्यावी कशी, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यापीठाने मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जवळच्या महाविद्यालयात ऑफलाईन परीक्षा देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, अनेक गावात नेटवर्क राहत नसल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भिती व्यक्त होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाuniversityविद्यापीठexamपरीक्षा