शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षांच्या परीक्षांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 15:55 IST

विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार असून तेथेच पेपर तपासल्या जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अंतिम वर्ष आणि सत्रांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने या परीक्षांचे नियोजन केले आहे. याविषयी महाविद्यालयांना पत्र पाठवून परीक्षा घेण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षांना सुरवात होणार आहे. विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार असून तेथेच पेपर तपासल्या जाणार आहेत.अंतिम सत्राच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा या आॅनलाईन पद्धतीने बहुपर्यायी स्वरुपात होणार आहेत. प्रत्येक युनिटवर १० प्रश्न अशा ६० प्रश्नांपैकी विद्यार्थंना ३० प्रश्न आॅनलाईन पद्धतीने शिकत असलेल्या महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रावर द्यावी लागणार आहे. परीक्षेचा कालावधी हा ९० मिनिटांचा राहणार आहे. इतर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा या उन्हाळी २०२० परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रीकांचा उपयोग करून त्या प्रश्न पत्रिकेतील कोणतेही तीन प्रश्न विद्यार्थ्यांना दोन तासात सोडवून पूर्ण करायचे आहेत. सर्व परीक्षांसाठी विद्यार्थी प्रवेशीत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार आहे. अभियांत्रिकी व तांत्रिक अभ्यासक्रम वगळून इतर अभ्यासक्रमातील अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना असलेल्या अनुशेष सत्राच्या परीखा विद्यापीठाकडे उन्हाळी परीक्षेसाठी तयार असलेल्या प्रश्नपत्रिका एका सत्राच्या रोज तीन प्रश्नपत्रिका व प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील कोतणेही दोन प्रश्न साडून तीन तासात तीन विषयीची परीक्षा पूर्ण करण्यात येईल. तीन विषयाच्या तीन उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयाच परीक्षा केंद्र राहणार आहे. लेखी परीक्षा आॅक्टरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. तसेच १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत.जवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधीकोरोना संसर्ग वाढत असल्याने अंतिम वर्ष/सत्रांच्या विद्यार्थ्यांना जवळचे महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. याविषयी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे विनंती करावी, तसेच परीक्षा सुरू होण्याच्या सात दिवसाआधी याविषयी माहिती विद्यापीठाला द्यावी लागणार आहे.त्यामुळे, कोरोनामुळे परीक्षेसाठी महाविद्यालयात न पोहचू शकणाऱ्यांना दिलासा मिळाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा