शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात सात व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:49 IST

संग्रामपूर : शासकीय तूर खरेदीतील गैरव्यवहारामुळे ७ व्यापार्‍यांवर २0 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे संग्रामपूर येथील तूर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात आता ७ व्यापारी, खविसंचे प्रभारी व्यवस्थापक आणि १२ संचालकांवर गुन्हा दाखल झाल्याने आरोपींची संख्या २0 वर पोहोचली आहे. 

ठळक मुद्देशासकीय तूर खरेदीतील गैरव्यवहारामुळे ७ व्यापार्‍यांवर गुन्हे दाखलतूर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात आता ७ व्यापारी, खविसंचे प्रभारी व्यवस्थापक आणि १२ संचालकांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : शासकीय तूर खरेदीतील गैरव्यवहारामुळे ७ व्यापार्‍यांवर २0 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे संग्रामपूर येथील तूर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात आता ७ व्यापारी, खविसंचे प्रभारी व्यवस्थापक आणि १२ संचालकांवर गुन्हा दाखल झाल्याने आरोपींची संख्या २0 वर पोहोचली आहे. संग्रामपूर येथे शासकीय तूर खरेदीमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमिततेप्रकरणी तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर व प्रभारी व्यवस्थापकावर फौजदारी कारवाई करा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह २0 सप्टेंबर रोजी बुलडाणा येथे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या दिला.  ‘दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपयर्ंत उपनिबंधक चव्हाण यांना खुर्चीतून हलु देणार नाही’ अशी आंदोलनात्मक भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली. त्यामुळे  उपनिबंधक  चव्हाण यांनी जळगाव जामोदचे सहाय्यक निबंधक अंभोरे यांना तामगाव पोलीस स्टेशनमध्ये संचालक मंडळाविरोधात तक्रार देण्यासाठी रवाना केले.दरम्यान, सहायक निबंधक अंभोरे यांनी २0 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा खविसंच्या १२ संचालकांविरोधात व प्रभारी व्यवस्थापकाविरोधात तामगाव पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये संग्रामपूर येथील ७ शेतकर्‍यांचाही समावेश होता. संबंधित व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांच्या नावे विकलेल्या तुरीच्या मालाच्या पैशाचा धनादेश स्वत:च्या नावे उचलणे असे तक्रारीत नमूद करण्यात आले. दरम्यान, उपरोक्त ७ व्यापार्‍यांनी विनाटोकन तूर खरेदी करीत, शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर स्वत:ची तूर विक्री केल्याचे उघडकीस आले. परिणामी, व्यापारी पीयूष अग्रवाल, हरीश जुगलकिशोर राठी, ओमप्रकाश पालीवाल, उमेश टावरी, देवकिसन खुशालचंद राठी, कृष्णा कुटे, कमल तुळशिराम गांधी या सात व्यापार्‍यांवर व खविसंचे १२ संचालक व प्रभारी व्यवस्थापक असे एकूण २0 जणांवर अप.नं.१७३/१७ कलम ४२0, ४६१, ४0६, ४७१, ३४ भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.