लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : एकतर्फी पे्रमातून व्हॉटस् अॅपवर लग्नाची गळ घालणाऱ्या एका पे्रमविराविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.खामगाव येथील शिवाजी वेस भागातील २९ वर्षीय युवती अकोला येथे आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. यावेळी तिचे विष्णू भगवान गिरी रा. चिखली या युवकाशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर तरुणीचा विवाह ठरला होता. मात्र, आरोपीने सदर तरुणीला व्हॉटस् अॅपवर लग्नाची गळ घालत, आपल्याशी लग्न न केल्यास व्हॉटस् अॅपवर क्लिप टाकून बदनामी आणि अॅसिड टाकून ठार मारण्याची धमकी दिली. या युवकाच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून सदर तरुणीने शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी विष्णू भगवान गिरी या आरोपीविरोधात कलम ३५४ ड, ५०६ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला.
प्रेमविराविरोधात गुन्हा दाखल
By admin | Updated: July 3, 2017 00:58 IST