बुलडाणा : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिचे धर्मांंतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदर आरोपीविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.बुलडाणा येथील रहिवासी असलेल्या इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे जबरदस्तीने अपहरण करून भिवंडी येथे बहिणीच्या घरी डांबून ठेवले तसेच तिच्यावर बला त्कार केला. तसेच पैशाचे आमिष दाखवून धर्मांंतर करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार सदर तरुणीने दिल्यावरून बुलडाणा पोलिसांनी आरोपी शे. मोहसिन विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तसेच इतर आरोपी शे. वसु शे. छोटू, सलीम खान दाऊद खान आदी विरुद्ध ३६३, ३६७, ३४२, १0९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी सलीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपी फरार झाले असून, अधिक तपास बुलडाणा पोलिस करीत आहेत.
धर्मांतर प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल
By admin | Updated: September 14, 2014 00:49 IST