शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, श्रमिक व सैनिकांसाठी लढा

By admin | Updated: April 4, 2016 02:01 IST

त्रिवेणी संग्राम संमेलनात राज्यभरातील श्रमिकांचा संकल्प.

बुलडाणा : शेतक-यांची मुले सैनिक आणि श्रमिक आहेत. त्यामुळे या तिन्ही घटकांच्या समस्या वेगळ्या नाहीत. शिवाय आर्थिकदृष्ट्या या तिन्ही घटकांची परिस्थितीही सारखी आहे. त्यामुळे यापुढे शेतकरी, सैनिक आणि श्रमिकांच्या प्रश्नासाठी संयुक्तरीत्या लढा उभारण्यात येईल, असे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केले.नवृत्त कर्मचारी समन्वय समिती यांच्या वतीने शेतकरी, श्रमिक, सैनिक यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी शहरात ३ एप्रिल रोजी स्थानिक जिजामाता प्रेक्षागार येथे त्रिवेणी संग्राम महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकरी, श्रमिक व सैनिक यांच्या ज्वलंत समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे तर अध्यक्षस्थानी समितीचे राष्ट्रीय सचिव कमांडर अशोक राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून ओआरओपीचे नेता जनरल सतबीर सिंग, माजी महाअधिवक्ता अँड. श्रीहरी अणे, शेतकरी नेते विजय जावंधिया, वामनराव चटप, समन्वय समितीचे महामंत्री प्रकाश पाठक, श्रमिक नेता देवराव पाटील, भीमराव डोंगरे, पुंडलीकराव पांडे उपस्थित होते.प्रास्ताविकात कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले, की शेतकरी, सैनिक व श्रमिक ही त्रिवेणी शक्ती या संग्राम महासंमेलनाच्या व्यासपीठावरून आता एकत्र आली असून, एकमेकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते काम करणार आहेत. यावेळी राज्याचे माजी महाअधिवक्ता अँड. श्रीहरी अणे, शेतकरी नेते वामनराव चटप यांनीही शेतकर्‍यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे यांनी श्रमिकांच्या समस्या मांडून, यासाठी लढा उभारण्याचे आवाहन केले. या त्रिवेणी संग्राम महासंमेलनासाठी राज्यभरातून जवळपास ७ हजार शेतकरी, सैनिक व श्रमिक उपस्थित होते.